Digvijay bhosale : शेतकरीपुत्र दिग्विजय भोसले झाला अग्निवीर....आडगाव भोसले येथे नागरिकांनी पुष्पहार घालून केले स्वागत

Digvijay bhosale : आडगाव भोसले येथील दिग्विजय पांडुरंग भोसले याने जिद्दीने शिक्षण पूर्ण करत अग्निवीर दलात भरती होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
digvijay bhosale joins agniveer
Digvijay bhosalesakal
Updated on

नाचनवेल : वयाच्या चौथ्याच वर्षी बापाचे छत्र हरविल्यानंतर जिद्दीने शिक्षण पूर्ण करत दिग्विजय पांडुरंग भोसले (वय १९, रा. आडगाव भोसले) आता अग्नीवीर दलात भरती झाला आहे. एक नव्हे, तर तीन विभागात त्याच्यासाठी नोकरीची संधी आली. त्याने बिकट परिस्थितीशी दोन हात करून अफलातून यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिग्विजय चार वर्षाचा असताना वडिलाने कौटुंबिक वादापायी व्यसनाधीन होऊन जगाचा निरोप घेतला होता. आई गृहिणी असून त्यांना दिग्विजय मुलगा व देवयानी ही मुलगी आहे. बिकट व हलाकीच्या परिस्थितीत मोलमजूरी करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले.

दोन्ही मुलांना परिस्थितीची जाण असल्याने त्यांनीही वेळप्रसंगी मोलमजूरी करून आईच्या कष्टाला साथ दिली. दिग्विजयने दहावीत ८० %, तर बारावीत ६५ % गुण घेऊन एअर फोर्समध्ये पहिल्या प्रयत्नात मेडिकल असिटंट पदासाठी प्रयत्न केला. परंतु, केवळ मेडिकल अनफीट झाल्याने निराश न होता बुद्धीमत्तेच्या जोरावर तो सैनिक दलात जनरल ड्यूटीच्या सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन २३ सप्टेंबरच्या निकालात अग्णीवीर म्हणून निवड झाली.

याशिवाय रेल्वे ऑपरेटरचा निकाल वेटींगवर असून जी.डी. अंतर्गत स्टॉप सलेक्शन कमीशन ग्राऊंड बाकी आहे. प्रथमच चालून आलेल्या संधीचे सोनं करण्यासाठी सैनिक दलातील अग्नीवीर निवडीला पसंती दिली. गावातील युनिक करिअर ॲकडमीचे मंजूर मदार यांनी त्यांची पूर्वतयारी करून घेतली. नाचनवेल गणातून एकमेव दिग्विजय भोसले यांची निवड झाली.

अन् आनंद गगणात मावेनासा झाला

निकालाच्या दिवशी २३ सप्टेंबरला गावातील कोतवाल राजेंद्र भोसले यांच्याकडे मक्याची कणसे डोक्यावर डाल्याने वाहत असताना अचानक मोबाइल खणखणला अन् निकाल ऐकून सर्वांनाच आनंद गगणात मावेनासा झाला.

या यशाबद्दल ॲकडमीचे संचालक मदार यांनी गावातील पहिले दिवंगत सैनिक तथा पोलिस अधिकारी फकिरराव भोसले यांनी स्वातंत्र्यपूर्व १९३७ मध्ये सैन्यात जाण्याचे धाडस केले होते. त्यांच्या निवासस्थानी दिग्विजय भोसले यांच्या माता अनिता भोसले व भगिणी देवयानी भोसले यांचा सत्कार केला. यावेळी अशोक भोसले, आसाराम भोसले, भाऊसाहेब भोसले आदी हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.