छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत चमचमीत जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये सहकुटुंब जाण्याचा ट्रेंड शहरात चांगलाच वाढला. मागील सहा दिवसांत शहरातील रेस्टॉरंट व्यवसायात तब्बल ३ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल झाली. दिवाळीच्या सुट्या संपेतो हा आकडा ९ कोटींच्या आसपास पोचणार आहे.