Sambhaji Nagar : वरिष्ठाच्या अंगावर धावले आरएमओ ; घाटी रुग्णालयातील प्रकार

डॉक्टरांची मध्यस्थी, प्रकरण शांत
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छ्त्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एक वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी (ता.१२) पाहणी करत असताना त्यांच्यात आणि आरएमओत जोरदार खडाजंगी झाली. आरएमओ हे अधिकाऱ्याच्या अंगावर जात असतानाच उपस्थित डॉक्टरांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले.

घाटीतील एक वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान परिसरात पाहणी करत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक दालनात ते गेले. तिथे एक आरएमओ बसलेले होते. येथे किती आरएमओ आहेत, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारली. यावर संबंधित आरएमओनी तोंडी ही माहिती अधिकाऱ्यांना दिली. पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यादी मागितली. परंतु, दालनातील लिपिक उपस्थित नसल्याने यादी मिळत नव्हती. तेवढ्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे दालनात आले.

यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आरएमओ भरलेत? असे म्हणताच आरएमओंचा पारा चढला. त्यांनीही चढ्या आवाजात उत्तर दिले. यानंतर आरएमओ थेट अंगावर धावून जाऊ लागले. तेवढ्यात उपस्थित डॉक्टरांनी मध्यस्थी केली. सुमारे पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यानंतर प्रकरण शांत झाले. वरिष्ठ अधिकारी आपल्या दालनात निघून गेले. आरएमओदेखील दुपारपर्यंत दालनात बसलेले पहायला मिळाले. या प्रकाराबाबत डॉ. हरबडे यांना विचारले असता, केवळ चर्चा सुरू होती, असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.