औरंगाबादच्या शिवन्यात धाडसी दरोडा, चार दिवसांत तिसऱ्या घटनेने खळबळ

औरंगाबादच्या शिवन्यात धाडसी दरोडा
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newsesakal
Updated on

शिवना (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शिवना (ता. सिल्लोड) येथील वाघेरा रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या राहत्या घरात चोरट्यांनी शुक्रवारी (ता.तीन) रात्री टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात चार लाखांचे दागिने लंपास केले. रविवारी (ता. २९) चोरट्यांनी येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाचे घर फोडून चार लाखांचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या दिवशी पोलीस पथक गावात असताना भरदिवसा दुपारी ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिरातून एक सोन्याची नथ व मंगळसूत्र लांबविले. ही घटना ताजी असतानाच या धाडसी दरोड्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Robbery Within Four Days In Sillod Taluka Of Aurangabad)

Aurangabad Crime News
Beed | दोन बहिणींचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू, माजलगावमधील धक्कादायक घटना

येथील भगवान बाळा भागवत यांच्या गावालगतच्या शेतातील घरात शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास हे थरारनाट्य घडले. आरसीसी बांधकाम असलेल्या या घराच्या उत्तरेकडील चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. स्वतः शेतकरी भगवानराव, त्यांच्या आई राधाबाई, पत्नी कमलबाई व तीन वर्षाचा नातू हॉलमध्ये झोपलेले होते. मुलगा रामचंद्र व सुन श्वेता यांच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडल्याने रामचंद्रने आजीजवळ झोपलेला आपला लहान मुलगा उठून आला असेल म्हणून दरवाजा उघडला. आणि जमिया, चाकू अशा धारदार शास्त्रांसह बनियान व जीन्स पॅन्टवर आलेल्या पंचवीस ते तीस वर्षे वयोगटातील सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला.

Aurangabad Crime News
मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मविआ'च्या नेत्यांची घेतली बैठक, राज्यसभेसाठी खलबते

काही जणांनी किचनमध्ये तर काहींनी हॉलमध्ये प्रवेश केला. महिलांच्या गळ्याला थेट चाकू लावत रोकड व दागिन्यांची मागणी केल्याने त्यांनी मुकाट्याने दागिने काढून दिले. गोंगाटात संधी साधत सून श्वेता हिने आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि मोबाईलवरून शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे शेजारचे रहिवाशी पळत आल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेत सुदैवाने कुणालाही मारहाण झाली नसली तरी, नागरिकांत मात्र दहशतीचे वातावरण आहे. या सहा जणांपैकी एकजण मराठीत तर इतर हिन्दी भाषेत बोलत असल्याचे व त्यांच्या कंबरेला बांधलेल्या झोळ्यांमध्ये दगड गोटे भरलेले असल्याचे या भेदरलेल्या महिलांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, बीट जमादार अरुण गाडेकर, गोपनीय शाखेचे पोलिस नाईक विकास लोखंडे, सीआईडी (क्राईम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंटचे) राहुल मोरे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तातडीने श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास मोहीम हाती घेतली. श्वान पथकाने लांबपर्यंत चोरट्यांचा माग काढला.

Aurangabad Crime News
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गोपीनाथ गडावर, पंकजा मुंडेंनी केले स्वागत

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिवना येथील मुख्य बाजारपेठेत रविवारी (ता. २९) रात्री एका वैद्यकीय व्यावसायिकाचे घर फोडून चोरट्यांनी चार लाखांचे सोन्या- चांदिचे दगिने लंबविले. सोमवारी सकाळीच उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी (ता. तीस) एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना, भर दिवसा दुपारी ग्रामदैवत श्री. शिवाई देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीची नथ व मंगळसूत्र लंपास केले. या घटनेला तीन दिवस उलटत नाही तोच रात्री दरोड्याची घटना घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.