Aurangpura : बांधकाम विभागाचेच कोसळले छत ; जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे छत रविवारी (ता. १८) अचानक कोसळले. रविवारची सुटी असल्यामुळे कार्यालयात कुणी नसल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र, यामुळे विभागातील कर्मचारी भयभीत झालेले असून, सोमवारी (ता.१९) त्यांनी जीव मुठीत धरून काम केले.
औरंगपुरा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे छत रविवारी (ता. १८) अचानक कोसळले. रविवारची सुटी असल्यामुळे कार्यालयात कुणी नसल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र, यामुळे विभागातील कर्मचारी भयभीत झालेले असून, सोमवारी (ता.१९) त्यांनी जीव मुठीत धरून काम केले.