छत्रपती संभाजीनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारनंतर (ता.एक) सुरवात होणार असून प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसेल. तथापि, पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
यंदा जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत ५४७ शाळांनी नोंदणी केली असून, त्यात ४ हजार ७० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे.
शाळेत कागदपत्रांची पडताळणी होणार नाही. ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असणार नाही, याची पालकांनी खबरदारी घ्यावी. प्रवेशावेळी नव्हे; पण प्रवेशानंतर काही दिवसांनी मुलाचे आधार कार्ड त्या शाळेत जमा करावेच लागेल.
आधार कार्ड न दिल्यास काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी प्रवेशित मुलाचे आधार कार्ड वेळेतच काढून ठेवणे आवश्यक आहे. ‘एनआयसी’कडून प्रवेशासंबंधीचा डेमो झाल्यानंतर प्रवेशाला सुरवात होणार आहे.
प्रवेशावेळी लागणारी कागदपत्रे
रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, आधार कार्ड, वीजबिल, राष्ट्रीयकृत बॅंक पासबुकपैकी एक)
वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न)
जन्माचा दाखला
संकेतस्थळावरून असा भरा अर्ज
सुरवातीला https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex या शासकीय वेबसाइटवरून अर्ज करावा. प्रथम विद्यार्थ्याची नोंदणी करा, पुन्हा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्डने लॉगिन करावे.
विद्यार्थ्याची मूळ माहिती भरून अर्जातील सर्व माहिती भरावी. अर्जातील माहिती भरून झाल्यावर शाळेची निवड करावी, अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरल्याची खात्री करून अर्ज सबमिट करावा.
आरटीई प्रवेश प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पडते. पालकांनी कोणत्याही व्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नये. ऑनलाइन पद्धतीने पार पडणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जातो.
— जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी
तालुका - शाळा - प्रवेश क्षमता
छत्रपती संभाजीनगर - ११७ - ८२६
गंगापूर - ९६ - ७७०
कन्नड - ३२ - १८४
खुलताबाद - २४ - १६०
पैठण - ४० - २५७
तालुका - शाळा - प्रवेश क्षमता
फुलंब्री - २१ - ७७
सोयगाव - ८ - ४७
सिल्लोड - २८ - २१२
यूआरसी-१ - ८३ - ७९८
यूआरसी-२ - ७१ - ५२९
वैजापूर - २७ - २१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.