मराठवाड्यातील ९६ विद्यार्थी मायदेशी परतले

युक्रेन-रशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेथे असलेले इतर देशांतील नागरिक आपापल्या देशात परतत आहेत. मराठवाड्यातील एकूण ११४ पैकी आतापर्यंत ९६ विद्यार्थी मायदेशी परतले
russia ukraine war update 96 students from Marathwada returned home aurangabad
russia ukraine war update 96 students from Marathwada returned home aurangabadsakal
Updated on

औरंगाबाद : युक्रेन-रशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेथे असलेले इतर देशांतील नागरिक आपापल्या देशात परतत आहेत. मराठवाड्यातील एकूण ११४ पैकी आतापर्यंत ९६ विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. अजून १८ विद्यार्थी येणे बाकी आहे.

मराठवाड्यातील एकूण ११४ विद्यार्थी हे मेडिकल अभ्यासक्रमासाठी युक्रेनला गेलेले आहेत. मात्र युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे तर विद्यार्थीदेखील भयभीत झाले आहेत. मात्र भारत सरकारच्या विशेष मोहिमेंतर्गत हे विद्यार्थी आता आपल्या मायदेशी परतू लागले आहेत. यासाठी भारत सरकारतर्फे विशेष मोहिमेद्वारे या विद्यार्थांना भारतात आणले जात आहे. मराठवाड्यातील एकूण ११४ विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंत ९६ विद्यार्थी परतले आहेत तर १८ विद्यार्थी लवकरच परतणार आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी ११, जालना ७ पैकी ६, परभणीतील ६ पैकी ३, बिडातील ४ पैकी ३, लातुरातील २७ पैकी २४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ पैकी ७ विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत. पैकी हिंगोलीतील ७ आणि नांदेड जिल्ह्यातील ३५ पैकी सर्व विद्यार्थी परतले आहेत. यानुसार, औरंगाबाद ५, जालना १, परभणी ३, बीड १, लातूर ३ आणि उस्मानाबादेतील ५ विद्यार्थी लवकरच परतणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()