करडईच्या वाटे काटेच.. काटे ! सूर्यफुलाचे पिक नामशेष होण्याच्या मार्गावर

बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या करडई व सूर्यफुलाचे क्षेत्र अक्षरश: शून्य टक्क्यावर
Sunflower Crops In Aurangabad
Sunflower Crops In Aurangabad esakal
Updated on

पाचोड (जि.औरंगाबाद ) : शेतकऱ्यांनी अलीकडील काळात ज्वारी व हरभरा पिकाला अधिक पसंती दिल्याने मागील आठ-दहा वर्षांपासून रब्बी हंगामातून तेलवर्गीय असलेल्या करडई व सूर्यफूलाचे (Sunflower) पिक जवळपास इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असून, यंदा यांचे क्षेत्र शून्य टक्क्यावर असल्याचे चित्र महसूल व कृषी विभागाकडील आकडेवारीवरून पाचोडसह पैठण तालुक्यात पाहावयास मिळते.

शासनाने तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात असलेली संधी विचारात घेऊन खाद्यतेल धोरणाला अनुसरून यंदा महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) अभियानाच्या माध्यमातून करडईचे (Safflower) नामशेष होणारे क्षेत्र जगविण्यासाठी यंदा शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम राबवून करडई लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. (Safflower, Sunflower Crop In Danger, Farmers Not Serious On These Crops In Paithan Taluka Of Aurangabad)

Sunflower Crops In Aurangabad
देशात काँग्रेस आजही बापच, नाना पटोले यांनी सुजय विखेंना सुनावले

परंतु बाजारात सर्वाधिक मागणी असलेल्या करडई व सूर्यफुलाचे क्षेत्र अक्षरश: शून्य टक्क्यावर येऊन हे तेलवर्गीय पीक हद्दपारच झाल्याचे चित्र पाहुन 'करडईच्या वाटे...काटेच काटे....!' ची अनुभूती पाहावयास मिळते. पूर्वी रब्बी हंगामात ज्वारीबरोबर करडईचे पीक घेतले जात असे, तर शेतकरी खरिपासह रब्बीत सूर्यफूल घेत होते. मात्र आता करडई व सूर्यफूल पिके घेण्याकडे सर्वच शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. आज सर्वत्र करडई व सूर्यफूलपासून उत्पादित तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या करडई व सूर्यफूलास अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही पिके घेण्याकडे पाठ फिरवून सोयाबीन, ज्वारी व हरभऱ्यास पसंती दिली आहे. पूर्वी आहारात करडईचे तेल वापरणे प्रतिष्ठेचे व आरोग्यवर्धक मानले जात असत. परंतु आजकाल करडई दुर्मिळ झाली. त्यातच करडई पिक घेतल्यास ती मनुष्यबळाअभावी काढणीला अवघड ठरत आहे. तसेच यांत्रिक पद्धतीने त्याच्या काढणीवर मर्यादा येऊन मजुरांवर करडई पिकाच्या सोंगणीसाठी अवलंबुन राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांस पसंती दिली. करडईच्या परिपक्वतेचा कालावधी ज्वारी, हरभऱ्यापेक्षा अधिकचा आहे. (Aurangabad)

Sunflower Crops In Aurangabad
अब्दुल सत्तारांमुळेच मी खासदार झालो, इम्तियाज जलील यांचा दावा

पूर्वी गहू, ज्वारी, हरभरा पिकांच्या सहा ते ओळीनंतर (पाटे पद्धतीने) करडईचा पेरा होत असे. या पिकांची निवड करताना कमी खर्च व कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन देणाऱ्या अन् अवर्षणाचा ताण सहन करणाऱ्या पिकांचा विचार केला जात असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैठण तालुक्यात करडईची पेर साधली जात होती. मात्र आता पैठण तालुक्यात सूर्यफूल व करडईचे क्षेत्र इतिहास जमा झाले. केकत जळगाव परिसरातील डोणगाव व टाका येथील अपवाद वगळता तालुक्यात सुर्यफुलाचे क्षेत्र दृष्टीआडच झाले आहे.

Sunflower Crops In Aurangabad
लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी : सुजय विखे

पूर्वी करडई सर्वात फायदेशीर पीक समजले जात असे. अवेळी पाऊस, विविध रोगांचा प्रादुर्भाव, तसेच इतर स्पर्धात्मक पिक सूर्यफूल व करडईचे बाजारात इतर पिकांच्या मानाने दर कमी असल्याने हे क्षेत्र घटण्याची प्रमुख कारणे आहेत. शेतकरी अधिक फायदा मिळणाऱ्या ज्वारी, गहु, सोयाबीन पिकांकडे वळाल्याने तुर्तास पैठण तालुक्यात करडईच्या वाट्यात काटे येऊन हे पिक इतिहास जमा होताना झाले. करडई पाठोपाठ सूर्यफुलाचेही क्षेत्रघटीचेही तेच कारण असून याचेही क्षेत्र शुन्यावर आले आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून करडई व सुर्यफूल या तेलबियाच्या शेतीकडे वळावयास हवे.

- संदीप शिरसाठ, तालुका कृषीधिकारी, पैठण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.