Sambhaji Nagar: जिल्हा बँकेला १४ कोटींचा फायदा, म्हणून ‘सत्तांतर’ नितीन पाटील यांची खंत

आता कन्नड विधानसभा निवडणूक लढणारच!
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal
Updated on

कन्नड - वडील सुरेश पाटील हे जिल्हा सहकारी बँकेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे जिल्हा सहकारी बँक नफ्यात आली असून त्यानंतर गत साडेचार वर्षात बॅंकेला तब्बल १४ कोटी रुपये फायदा मिळवून दिला. मात्र, राजकीय गैरसमजातून अध्यक्षपदावरून राजीनामा घेऊन ''सत्तांतर '' घडविण्यात आले, अशी खंत जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक माजी आमदार नितीन पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यात रविवारपासून (ता.२०) जनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात त्यांनी शनिवारी (ता.१९) बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेचे प्रदीर्घकाळ अध्यक्षपद वडील सुरेश पाटील यांनी भूषविले तसेच सचोटीने त्यांनी बँक चालविली तोच वारसा साडेचार वर्षे मी चालविला.

आज ही बँक मराठवाड्यातील सर्वाधिक उत्तम बॕक गणली गेली असून आज बॅंकेकडे २५०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. १४०० कोटी रुपये कृषी कर्ज म्हणून वाटले आहे. असे असताना राजकीय समज, गैरसमजातून मला बँकेचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे जनतेत माझ्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. कारण मी चुकीचे काम केले नाही.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : पावसाअभावी वाळलं अन् ‘लष्कर’ने संपवलं

पालकमंत्री संदीपान भुमरे, पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आता कोणत्याही परिस्थितीत मी कन्नड विधानसभा विधानसभा निवडणूक लढणारच आहे. रविवारपासून (ता.२०) देवगाव रंगारी येथून जनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे.

मी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेणार आहे. कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे गटाला सुटणार आहे. त्यात शंका नाही. कारण या ठिकाणी विरोधी पक्षाचा म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा आमदार आहे. या ठिकाणी भाजपचा आमदार नसल्याने ही जागा भाजपला सुटण्याचा प्रश्नच नाही आणि तसे ते दावाही करू शकत नाही.

Sambhaji Nagar
Pune: रणरागिनी एकवटल्या, इंदापूरमधील वीस हजार महिलांची साखळी

दरम्यान, पालकमंत्र्यांना जिल्ह्याचे राजकारण चांगले समजते. त्यामुळे निश्चितपणे एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी मलाच मिळणार आहे. त्या दृष्टीने जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. कन्नड तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबत शासनाकडे अनुदानाची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार उदयसिंह राजपूत यांनी विधानसभेत यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. परंतु त्यांना त्यासाठी वेळ नाही आणि त्यांना जनतेचे प्रश्न समजतात की नाही हाच प्रश्न आहे. नागद ग्रामपंचायतीत, कृषी उत्पन्न बाजार समितीत व सोसायटीत जनतेने विद्यमान आमदारांना

Sambhaji Nagar
Mumbai-Goa Highway : टोलनाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या 14 पदाधिकाऱ्यांना अटक

नाकारल्याने जनता आता पर्यायाच्या शोधात असल्याचा दावा श्री पाटील यांनी केला. याप्रसंगी खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश पाटील डोळस, मेहगावचे सरपंच पांडुरंग घुगे, बाजार समितीचे संचालक कैलास अकोलकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश आबा बोडखे, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()