Sambhaji Nagar : अद्याप १४१ ग्रामपंचायतींत नाही इंटरनेटची सुविधा ;जिल्ह्यातील चित्र,खोदकामांमुळे रखडली प्रक्रिया

प्रशासकीय कामांना गती मिळावी व जनतेची कामेही लवकर व्हावीत यासाठी सध्या ग्रामपंचायती इंटरनेट सुविधेशी जोडण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४९२ पैकी ३५० ग्रामपंचायती आतापर्यंत इंटरनेट सुविधेशी जोडण्यात आल्या.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रशासकीय कामांना गती मिळावी व जनतेची कामेही लवकर व्हावीत यासाठी सध्या ग्रामपंचायती इंटरनेट सुविधेशी जोडण्याचे काम सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४९२ पैकी ३५० ग्रामपंचायती आतापर्यंत इंटरनेट सुविधेशी जोडण्यात आल्या. उर्वरित ग्रामपंचायतींची कामे खोदकामांमुळे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑॅप्टिक फायबरने जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या माध्यमातून १० एमबीपीएसपर्यंत स्पीड असलेल्या इंटरनेट सेवा ग्रामपंचायती, अंगणवाड्या, पोलिस ठाणे, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४९२ ग्रामपंचायतींमध्ये बीएसएनएल कंपनीच्या माध्यमातून ऑप्टिक फायबरने इंटरनेट सुविधा जोडण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, वैजापूर आणि पैठण या चार तालुक्यांमधील ३५० ग्रामपंचायती आतापर्यंत इंटरनेट सुविधांशी जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

उर्वरित ग्रामपंचायती जोडण्याचे काम बीएसएनएलच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सध्या जलजीवन मिशन, रस्त्याचे रुंदीकरण, महावितरणचे पोल लावणे यासह अन्य कामे सुरू आहेत. या कामादरम्यान बऱ्याच जागी ऑप्टिक फायबरचे नुकसान होत आहे. परिणामी, इंटरनेट सुविधेने ग्रामपंचायती जोडण्याच्या कामात अडचणी येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()