Sambhaji Nagar : ‘टायगर सफारी’साठी मिळणार आणखी १७ हेक्टर जमीन; जिल्हा प्रशासनाकडून प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सध्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, काही दिवसांपूर्वीच प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stage
Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stageSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून मिटमिटा येथे १०० हेक्टर जागेवर सफारी पार्क विकसित केले जात आहे. सफारी पार्कला लागूनच ‘टायगर सफारी’साठी जागा मिळावी, म्हणून महापालिकेतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार १७ हेक्टर जमीन महापालिकेला मिळणार असून, यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stage
Pune Crime : एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून बँक खातेदारांना गंडा घालणारे अटकेत

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने वारंवार आक्षेप घेतले होते. काही काळासाठी प्राणिसंग्रहालयाची परवानगी नाकारण्यात आली होती.

प्राणिसंग्रहालय मिटमिटा भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेत स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत काम हाती घेण्यात आले. या प्रकल्पावर जवळपास २५० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stage
Mumbai News : वर्सोवा नौका दुर्घटना; बेपत्ता मच्छीमाराचा सापडला मृतदेह

सध्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, काही दिवसांपूर्वीच प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ॲप्रोच रोडचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला. डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. सफारी पार्कसाठी अग्निशमन विभागाने नुकतेच ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stage
Mumbai Local Train Update : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या पहिल्या फास्ट लोकलची वेळ बदलली

त्यामुळे आता पाणीपुरवठा, ड्रेनेज, इलेक्ट्रिक वर्क, अग्निशमन यंत्रणा, सर्व्हिस रोड, जलकुंभ, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणारा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गती येणार आहे. दरम्यान सफारी पार्कशेजारीच टायगर सफारीसाठी १७ हेक्टर जागा मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा प्रशासनातर्फे १७ हेक्टर जागा देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Sambhaji Nagar Another 17 hectares land available Tiger Safari process district administration final stage
Mumbai Crime : सोमवार असल्याने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा म्हणत डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीकाची लूट

पर्यटकांची वाढणार संख्या

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. मिटमिटा भागात प्राणिसंग्रहालय स्थलांतरित झाल्यानंतर व टायगर सफारी सुरू झाल्यास पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची टायगर सफारी सुरू होणार आहे. सफारी पार्कमध्ये प्राण्यांसाठी ४० मोठे पिंजरे, घरे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील २९ पिंजरे पूर्ण झाले आहेत. १५ पैकी १० इमारतींचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.