Sambhaji Nagar : बैलपोळ्यावर लम्पीचे सावट मिरवणूक टाळा, पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून लम्पी प्रादुर्भाव वाढला आहे, यात २ हजार २६३ जनावरे बाधित झाले असून आतापर्यंत ९६ जनावरे दगावली आहेत. तर ५५२ जनावरांवर उपचार सुरू आहेत.
sambhji nagar
sambhji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यात लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुरुवारी (ता.१४) जनावरांची मिरवणूक, यात्रा, बाजार आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. गुरुवारी पोळा सण आहे. या दिवशी शेतकरी,

पशुपालक आपल्या बैलांची सजवून गावोगावी वाजत गाजत मिरवणूक काढत असतात. मात्र, यंदा लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आलेली असल्याने पोळा सणावर लम्पीचे सावट राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सर्जा-राजाची घरीच पूजा करावी लागणार आहे.

sambhji nagar
Sambhaji Nagar Update : शहरासाठी १०० ई-बस,शासनाला पाठविला स्मार्ट सिटीने प्रस्ताव

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून लम्पी प्रादुर्भाव वाढला आहे, यात २ हजार २६३ जनावरे बाधित झाले असून आतापर्यंत ९६ जनावरे दगावली आहेत. तर ५५२ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

sambhji nagar
Nashik News : उत्तर महाराष्ट्रात 200 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पाच जिल्ह्यांत आठ महिन्यांतील दुर्दैवी चित्र

दरम्यान लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बैलपोळा सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तर शेतकरी, पशुपालकांनी आपल्या गोठ्यात फवारणी, निर्जंतुकीकरण करून जनावरांना हळद, तेल, करंज तेल, निंबोळी तेल, कापूर इ. आयुर्वेदिक साहित्य वापरून खांदेमळणी करावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले

sambhji nagar
Satara News : पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराडला मुस्लिम समाजाची पोलिसांसमवेत बैठक; संशयीतावर कारवाईची मागणी

कोणत्याही परिस्थीतीत बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात येऊ नये व जनावरे एकत्रित आणण्यात येऊ नयेत. तसेच गोठ्यातच बैलपोळा सन साजरा करण्याकरिता गावोगाव प्रसिद्धी व प्रचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.