Sambhaji Nagar Cabinet Meeting : शहरातील प्रमुख रस्ते बंद तर तब्बल इतक्या पोलिसांचा चोख बंदोबस्त

Cabinet Meeting Decision
Cabinet Meeting Decisionsakal
Updated on

Sambhaji Nagar Cabinet Meeting : तब्बल ७ वर्षांनी संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात येणार आहेत. यावेळी पोलिसांचाही मोठा फौजफाटा असणार आहे.

Cabinet Meeting Decision
Sambhaji Nagar Cabinet Meeting: सीईओंच्या दालनात बसणार मुख्यमंत्री ; प्रशासनाने घेतला ताबा

बंदोबस्तासाठी सहा पोलिस अधीक्षक, २३ पोलिस उपाधिक्षक (सहायक आयुक्त), ११५ पोलिस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, एक हजार ७०० पोलिस अंमलदार, १४७ महिला पोलिस अंमलदार, राज्य राखीव पोलिस बलाच्या चार कंपन्या, ७८ एचएसपी, पाचशेवर होमगार्ड तसेच शहर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी असा सात हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत.

Cabinet Meeting Decision
Sambhaji Nagar Cabinet: दीड हजारांची थाळी ते फाईव्हस्टार हॉटेलात मुक्काम; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर

या वेळेत हे मार्ग राहणार बंद

शहानूरमिया दर्गा ते सूतगिरणी चौक सकाळी सात ते दहादरम्यान बंद असेल.

भडकलगेट ते अण्णा भाऊ साठे चौक सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत बंद असेल.

गोपाल टी ते सिल्लेखाना व क्रांतीचौक उड्डाणपूल पूर्व आणि क्रांती चौक उड्डाणपूल

पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता हा १६ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री एकदरम्यान बंद राहील.

क्रांती चौकमार्गे अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला बाजार, नागेश्वरवाडी,

खडकेश्वर टी, सांस्कृतिक मंडळ, ज्युबली पार्क ते भडकल गेट हा रस्ता सायंकाळी पाचपर्यंत बंद.

वोक्हार्ट टी ते लहुजी साळवे चौक मार्ग जयभवानी चौकपर्यंत, लहुजी साळवे चौक ते कलाग्राममार्गे

बिकानेर स्वीट पर्यंत व कलाग्राम ते आयुष पेपर मिलपर्यंत रस्ता सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत बंद असेल.

Cabinet Meeting Decision
Chhatrapati Sambhaji Nagar : तब्बल ४०० वर्षांपूर्वी शहर होते ‘स्मार्ट’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.