Sambhaji nagar : राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय छत्रपती संभाजीनगर

नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप अन् शक्तिप्रदर्शन
Politics
Politicsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेतील फूट आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरणानंतर मागील काही महिन्यांपासून शहर राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय. महाविकास आघाडीच्या राज्यातील पहिल्याच वज्रमूठ सभेसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड केली. या सभेच्या दिवशी भाजप-शिवसेना (शिंदे गटातर्फे) सावरकर गौरव यात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीतच ८ किंवा ९ एप्रिल रोजी धनुष्यबाण यात्रा काढली जाईल. शक्तिप्रदर्शन, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू असताना किराडपुरा भागात दंगल झाल्याने शहर राज्यात राजकीयदृष्ट्या चर्चेतील शहर झाले आहे.

राज्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या सभेसाठी शहराची निवड केली. येथे चार आमदार शिवसेना (शिंदे) गटात गेले आहे. त्यामुळे येथे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद दाखविण्यासाठी वज्रमूठ सभेतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

सभा महाविकास आघाडीची असली तरी यासाठी ठाकरे गटाने सगळ्यात जास्त पुढाकार घेतलेला दिसला. येथे लावलेल्या सगळ्यात पोस्टर, बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचाच चेहरा मोठा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्याच भाषणांची सर्वांना उत्सुकता राहिली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान भरल्याने त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गटावर) सर्वाधिक शाब्दिक हल्ला केला आहे.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. वज्रमूठ या पहिल्याच सभेतून महाविकास आघाडीचे सर्व नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच व्यासपीठावर दिसले. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाने) महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच आपल्या कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवत सावरकर गौरव यात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Politics
Sambhaji nagar : अनुदानांमुळे फुगला महापालिकेचा अर्थसंकल्प

या यात्रेतून त्यांचा उद्धव ठाकरे गट सर्वाधिक निशाण्यावर होता. एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बाजूला महाविकास आघाडी आणि दुसरीकडे भाजप-शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यातून आगामी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार आघाडी उघडण्यात आली आहे. या सगळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर सातत्याने चर्चेत राहत आहे. आता या शक्तिप्रदर्शनानंतर शिवसेना (शिंदे गटातर्फे) ८ किंवा ९ एप्रिल रोजी धनुष्यबाण यात्रा काढली जाणार आहे.

Politics
Sambhaji nagar : नव्या प्राणिसंग्रहालयात येणार ‘जंगलाचा राजा’

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडीच्या सभेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संबोधित करण्याची शक्यता आहे. हिंदू आक्रोश मोर्चा, महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, भाजप-शिंदे गटाची सावरकर यात्रा तसेच किराडपुरा भागात झालेली दंगल, या सर्व घटना-घडामोडीमुळे छत्रपती संभाजीनगर हे राजकीयदृष्ट्या राज्यातील घटना-घडामोडींचे शहर बनत चालले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.