Sambhaji Nagar : सव्वाचारशे कोटींच्या योजनांचे मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

महापालिका २७५ कोटींच्या ड्रेनेजलाइनसह इतर कामांचा समावेश
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षांची यंदा सांगता होणार असून, त्यानिमित्ताने शहरात १५, १६ व १७ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा रोषणाई करण्यात आली आहे. त्यासोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सुमारे सव्वाचारशे कोटींच्या कामांचा समावेश आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा १६ सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध विकास कामांना निधी मिळावा, यासाठी १९०० कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने सादर केला आहे.

sambhaji nagar
Beed : बनावट दुधाचा पर्दाफाश ब्रह्मगाव, हाजीपूरच्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई २७९४ लिटर दूध नष्ट

त्यासोबत शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची तयारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लेबर कॉलनी येथे आयोजित कार्यक्रमात १२ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. त्यात शहरातील १०० कोटींचे रस्ते, सातारा-देवळाई भागातील ड्रेनेजलाइनच्या कामाचे भूमिपूजन यासह इतर कामांचा समावेश आहे.

sambhaji nagar
Nanded News : जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

निविदा प्रक्रिया पूर्ण, आता कामांवर भर

घाईगडबडीत मोठ्या संख्येने कामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण ठेवू नये. जी कामे आगामी काही महिन्यात सुरू होऊ शकतात, अशाच कामांचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १२ कामांचा समावेश करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी आहेत कामे

सातारा-देवळाई ड्रेनेजलाइन २५० कोटी

शहरातील अंतर्गत रस्ते-१०० कोटी

हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प-५५ कोटी

महापालिकेतर्फे खरेदी केलेली यंत्रसामग्री- १ कोटी ६७ लाख

कमल तलाव सुशोभीकरण- २ कोटी ७८ लाख

स्मार्ट गुरू ॲप कंट्रोल रूम-२७ लाख

प्रभाग कार्यालय आठचे लोकार्पण

हडको एन-१२ येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण

हर्षनगर येथील आपला दवाखान्याचे लोकार्पण

sambhaji nagar
Pune News : पुण्यात तीन परवाना निरीक्षक निलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.