atm cctv
atm cctv sakal

Sambhaji Nagar Crime : सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून फोडले एटीएम

बजाजनगरात पहाटे प्रकार चोरीला गेलेला ऐवज गुलदस्त्यात .
Published on

वाळूज महानगर - बजाजनगर येथील अत्यंत गजबजलेल्या चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी कटरने कट करून फोडले. मात्र, यात किती पैसे चोरीला गेले ते अद्यापही गुलदस्त्यात आहे. चोरीची घटना सोमवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः बजाजनगर येथील जयभवानी चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये घुसून चोरट्यांनी तेथील सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून तसेच विद्युत पुरवठा खंडित करून एटीएममधील रोख रक्कम लंपास केली.

या एटीएममध्ये किती रक्कम होती हे अद्यापही गुलदस्त्यात असून ते ऑडिट केल्यानंतरच उघड होणार आहे. सोमवारी (ता.११) पहाटे २.४५ ते ३ वाजेच्या दरम्यान म्हणजेच अवघ्या पंधरा मिनिटात ही चोरी झाली.

या प्रकरणी युरोनेट सर्व्हिस इंडिया प्रा.ली. चे एटीएम अधिकारी नितीन प्रल्हाद वाघमारे रा. गंगोत्री पार्क, वडगांव कोल्हाटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, चेकिंग अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस पोलीस उपनिरीक्षक सचिन पांगोटे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच चोरट्यांच्या मागावर पथके रवाना केली.

एकाच रात्री फोडले दोन एटीएम

विशेष म्हणजे, याच आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील सातारा व पिपळगाव बंसवत (जिल्हा नाशिक) येथील एटीएम फोडले आहेत. एटीएम फोडणारे आरोपी हे उत्तर भारतीय असण्याची शक्यता असून त्यांनी एटीएमच्या सिक्युरिटी यंत्रणेचा अभ्यास करून ही चोरी केली. गुन्ह्यात महागडी कार वापरलेली आहे. शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.