Crime news : मारहाणीचा अपमान न झाल्याने एकाची आत्महत्या

आठ जणांविरुद्ध साेयगाव ठाण्यात गुन्हा दाखल
Farmer suicide
Farmer suicideesakal
Updated on

सोयगाव : शेतातील सामाईक विहिरींच्या पैशाच्या देवाण घेवाणीवरून झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने एका शेतकऱ्यांने शेतातच कीटकनाशक घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता जरंडी येथे घडली. याप्रकरणी बुधवारी (ता.२१) सोयगाव ठाण्यात आठ जणांविरुद्ध आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मृतावर बुधवारी सायंकाळी पाच वाजता पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेख भैया शेख महंमद (वय ६०, रा.जरंडी ता.सोयगाव) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जरंडी येथे गट क्र-१६० मध्ये फिर्यादीच्या चुलत भावाच्या तीन एकर मध्ये विहीर होती. सदर विहिरींचे शेत हे दीड महिन्यांपूर्वी अरविंद राठोड यांनी सौदा पावतीवर फिर्यादीच्या चुलत भावाकडून घेतले (खरेदी नाही) होते. परंतु या गटातील विहीर ही सामाईक असल्याने त्या विहिरींच्या खोद कामासाठी लागलेला खर्च म्हणून त्या पोटी काही रक्कम देण्याचे २२ जून रोजी ठरले होते.

Farmer suicide
Latur crime news : जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

दरम्यान अरविंद राठोड यांनी शेख भैय्या यास मंगळवारी (ता.२०) फोन करून सांगितले की पैसे द्यायचे आहे. त्यासाठी शेतात बैठक ठेवली आहे. परंतु बैठकीतच झालेल्या पैशाच्या वादातून अरविंद राठोड यांनी जमविलेल्या काही नागरिकांकडून शेख भैय्या शेख महंमद यांच्यासह शरीफाबी शेख, शफीक शेख, रफिक शेख या चौघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शरीफाबी शेख, शफीक शेख ,रफिक शेख हे तिघेही जखमी झाले.

दरम्यान बैठकीतील काहींनी हा वाद मिटविला. मात्र, कुटुंबासह स्वतः ला झालेली मारहाण शेख भैय्या शेख महंमद (वय ६०) यांना सहन न झाल्याने त्यांनी मंगळवारी दुपारी शेतात एका झाडाखाली विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील गाडे यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बुधवारी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्यावर संतप्त कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करून आरोपी अटकेत घेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्या.

Farmer suicide
Crime news : पाच जणांनी पळवला ‘तो’ हायवा;सीसीटीव्हीत झाले उघड

यामुळे पोलिसांनी तातडीने मृत शेतकऱ्याचा मुलगा शेख शफीक शेख (वय ३२) याच्या फिर्यादीवरून अरविंद राठोड, प्रवीण राठोड, संघपाल सोनवणे, समाधान राठोड, रामसिंग चव्हाण, नितीन चव्हाण, गणेश पवार,विशाल चव्हाण सर्व रा.जरंडी (ता सोयगाव) या आठ जणांविरुद्ध आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.तपास निरीक्षक अनमोल केदार, जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे, गणेश रोकडे, अजय कोळी, दिलीप पवार हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.