विजयनगरातील बेपत्ता राजेश विजय कापसे (वय ३५) यांच्या हत्येचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला. १० सप्टेंबरला सायंकाळी पिंपळगाव पांढरी शिवारात कापसेचा शिर नसलेला मृतदेह आढळला होता.
या प्रकरणात दोन मारेकऱ्यांपैकी एकाला बेड्या ठोकल्या. दोघांनी त्यांना आधी दारू पाजली. नंतर दुचाकीवरून धुळे-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारात नेले. तेथे गळा चिरला आणि शिर धडावेगळे करून फेकून दिले, अशी कबुली अटकेतील आरोपीने दिली. मात्र, अद्यापही खुनाचे कारण गुलदस्त्यात असून प्रमुख आरोपी अटक झाल्यानंतर याचा उलगडा होणार आहे.