फुलंब्री : फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या असलेल्या जमिनीतून समृद्धी महामार्ग लगत कोट्यवधी रुपयांच्या मुरुमाची चोरी झाली. हा प्रकार आमदार हरिभाऊ बागडे यांनी निदर्शनास आणून देत चौकशीची मागणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाने चौकशी केली. परंतु सदरील चौकशी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सावंगी परिसरात समृद्धी महामार्ग लगत कोट्यवधी रुपयाची जमीन आहे. या जमिनीतून समृद्धी महामार्गाचे व छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना मुरमाची चोरटी वाहतूक झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमदार हरिभाऊ बागडे यांनी थेट पत्रकारांना घेऊन कारखान्याच्या
मुरमाच्या चोरीचा प्रकार घटनास्थळी नेऊन निदर्शनास आणून दिला. त्यावेळी सर्व वर्तमानपत्रात संबंधित बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर व आमदार बागडे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल विभागाने चौकशी समिती नेमून चौकशी केली.
परंतु सदरील चौकशीत अधिकाऱ्यांनी केवळ फक्त मुरमाची चोरी झाली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. यात सुमारे २२ कोटी ८८ लाख रुपयांच्या मुरमाची येथून चोरी झालेली आहे. हे चौकशी अंती स्पष्ट झाले असून हा मरून कुणी चोरून नेला
याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
देवगिरी कारखान्याची ही जमीन अवसायक आणि राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात होती. त्यांनी या वास्तूचे जतन का केले नाही. तसेच चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नेमकी कशाची चौकशी केली असा प्रश्न आमदार बागडे यांनी उपस्थित केला आहे.
ज्यांनी मुरमाची चोरी केली त्यावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु सदरील चौकशी समितीने जमिनीची पाहणी करून केवळ अज्ञातावर गुन्हा दाखल करून यातून काढता पाय घेतला.
-हरिभाऊ बागडे (आमदार, फुलंब्री मतदार संघ)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.