Sambhaji Nagar : सांगा, कुणासोबत उभे राहायचे? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रश्न ; भाजप, शिंदे, ठाकरे गट लागले कामाला

त्यामुळे दोन्ही गटांकडून संघटनात्मक बांधणी व मेळावे घेण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. तीच परिस्थिती आता राष्ट्रवादीची आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal
Updated on

मोबीन खान

वैजापूर - राज्यातील सत्तांतरानंतर तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींच्या राजकीय भूमिकेविषयी संशय घेतला जात आहे. पक्षाच्या नेत्याला दैवत, विठ्ठल अशी ज्यांना एकेकाळी उपमा दिली, त्यांनाच सोडून सत्तेसाठी दुसऱ्यांना जवळ करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

त्यामुळे नेत्यांचे कार्यकर्ते कुणासोबत उभे राहायचे, या संभ्रमात आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गट व शिंदे गटाचे संपूर्ण वर्ष आरोप-प्रत्यारोपात गेले.

त्यामुळे दोन्ही गटांकडून संघटनात्मक बांधणी व मेळावे घेण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. तीच परिस्थिती आता राष्ट्रवादीची आहे. पण, भाजपने संघटन वाढीवर जोर दिला.

आमदार रमेश बोरणारे यांनी शिवसेनेत उठाव करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेल्यापासून तालुक्यात करोडो रुपयांच्या ‘निधी’चा महापूर बघायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्याने बोरणारेंची वाट सुकर झाली.

Sambhaji Nagar
Mumbai-Pune Expressway Traffic Update : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर आज पुन्हा २ तासांचा ब्लॉक; जाणून घ्या महत्वाची अपडेट

राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. ग्रामीण भागात चिकटगावकरांचा मोठा जनसंपर्क आहे.

पंधरा वर्षांपासून विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. त्यात सच्चे शिवसैनिक आजही ठाकरे गटासोबत निष्ठेने उभे आहेत. जर, चिकटगावकरांना ठाकरे गटाकडून संधी मिळाली तर चमत्कार घडू शकतो, असे राजकीय जाणकारांचे गणित आहे.

Sambhaji Nagar
Pune Crime : अदनान अली आणि दहशतवाद्यांच्या ‘कनेक्शन’बाबत तपास!

राज्यातील सत्तांतरानंतर भाजप संघटन वाढीवर अधिक फोकस करताना दिसले. त्यामुळे तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत झाले आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांची नगरपालिकेवर गेल्या १५ ते २० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे.

शांत, संयमी व कोणतेही निर्णयाचे ‘रिझल्ट’ जागेवर लावणे अशी परदेशी यांची ओळख असल्याने परदेशीच्या घरी दररोज ‘जनता दरबार’ भरलेला असतो. म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर आता भाजप वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशी मोठी जबाबदारी दिली. येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपकडून परदेशी प्रबळ दावेदार मानले जातात.

Sambhaji Nagar
Mumbai Dams : तुळसी, विहार, तानसापाठोपाठ मोडक सागरही ओव्हर फ्लो

राष्ट्रवादीचे रिमोट चव्हाणांकडे

चिकटगावकरांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर येथील राष्ट्रवादीचे सूत्र आता आमदार सतीश चव्हाण यांच्या आदेशाने हलतात. मध्यंतरी राष्ट्रवादीचा जम बसत होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरी नंतर येथे दोन गट पडल्याने राष्ट्रवादीचे घडी पुन्हा विस्कटली आहे.

संचेतींमुळे काँग्रेसचे कमबॅक

येथील कॉंग्रेस माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेतीमुळे टिकून आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत संचेती यांनी उभे केलेले उमेदवार विजयी झाल्याने तालुक्यात कॉंग्रेसला पुन्हा संजीवनी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.