जालना - मागील आर्थिक वर्षात झालेल्या अतिवृष्टीसह यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून घोषणा ही करण्यात आली आहे. मात्र, ही अनुदानाची रक्कम ऑनलाइनच्या फेऱ्यात अडकल्याने जिल्ह्यातील निम्म्या शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप एक रुपयाही पडलेला नाही.
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर मार्च, एप्रिल २०२३ मध्ये ही अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यात जिरायती, बागायत आणि बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच २०२२ मध्ये सततच्या पावसाने ही पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
शिवाय २०२१ व २०२२ मध्ये ही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून ५४३ कोटी १३ लाख ८६ हजारांचे अनुदान मंजूर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र, ऑनलाइनच्या फेऱ्यात हे अनुदान अडकून पडले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठक अहवालानुसार जिल्ह्यातील चार लाख २८ हजार ५२९ शेतकऱ्यांसाठी ४०४ कोटी ९२ लाख ५१ हजार २६४.४४ रुपये राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी तीन लाख १८ हजार ४२६ शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन अपलोड केल्यात आहेत.
मात्र, आधार लिंक नसणे, बँक खात्यात चूक असणे आदी कारणामुळे ७४ हजार ९१४ शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन याद्या अपलोड करून ही पैसे पडले नाहीत. तर दोन लाख ४३ हजार ५१२ शेतकऱ्यांच्या खात्यात २५२ कोटी ८७ लाख १० हजार ८७६.९४ रुपयांचे अतिवृष्टी, गारपिटीचे अनुदान जमा झाले आहे. तर तब्बल एक लाख ८५ हजार १७ शेतकऱ्यांचे अनुदान ऑनलाइनच्या फेऱ्यात अडकून पडले आहेत. या फेऱ्यातून कधी सुटका होणार आणि हे अनुदान कधी या शेतकऱ्यांना मिळणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
याद्याच अपलोड झाल्या नाहीत
मार्च, एप्रिल २०२३ महिन्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि २०२२ सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याच ऑनलाइन अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळे लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या ऑनलाइनच्या खेळामुळे जिल्ह्याला निधी मिळून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अनुदानाबाबतची स्थिती
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ ची अतिवृष्टी : ३९७ कोटी ७३ लाख १४ हजार
मार्च २०२३ चा अवकाळी पाऊस : तीन कोटी ६७ हजार ८८ हजार
एप्रिल २०२३ चा अवकाळी पाऊस : सहा कोटी ५८ लाख चार हजार
२०२१ व २०२२ मधील गारपीट, अवकाळी पाऊस : ९२ लाख ५२ हजार
२०२२ मध्ये सततचा पाऊस : १३४ कोटी २२ लाख २८ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.