Sambhaji Nagar : जि.प.ला मिळाले नवीन ४०८ शिक्षक

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षक भरतीतून नवे ४०८ प्राथमिक शिक्षक उपलब्ध झाले आहेत. निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून (ता. चार) सुरू झाली.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षक भरतीतून नवे ४०८ प्राथमिक शिक्षक उपलब्ध झाले आहेत. निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारपासून (ता. चार) सुरू झाली. पडताळणी सहा मार्चपर्यंत सुरू राहाणार असून, त्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, असे शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

राज्यभरात २१ हजार ६७८ पदांसाठी शिक्षक भरतीच्या जाहिराती शासनाने ५ फेब्रुवारी रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या शाळांतील ११ हजार ८५ उमेदवारांची ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी ४०८ शिक्षकांची यादी पवित्र पोटर्लवर प्रसिद्ध झाली आहे. त्यातून मराठी माध्यमासाठी ३७०, तर उर्दू माध्यमासाठी ३८ जागा भरण्यात येणार आहेत.

त्यानुसार गुणवत्ता यादीतील पहिल्या १४० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सोमवारी झाली. मंगळवारी (ता. पाच) पुढील १४० तर ६ मार्च रोजी १२८ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर समुपदेशनाद्वारे या नवीन उमेदवारांची रिक्त ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षातच त्यांच्या कामाची सुरवात होऊ शकते.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar Crime : कंत्राटदाराला १ कोटी १५ लाखांचा घातला गंडा

सोयीच्या जागांसाठी आतापासूनच धडपड

शिक्षक भरतीमध्ये जे उमेदवार पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरले आहेत, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर त्यांना नियुक्ती दिली जाईल. मात्र, अजून कागदपत्रांची पडताळणीही सुरू झाली नाही, तोच सोयीचा तालुका आणि सोयीची शाळा मिळावी, यासाठी भावी शिक्षकांनी धडपड सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()