Sambhaji nagar : अनुदानांमुळे फुगला महापालिकेचा अर्थसंकल्प

२९३ कोटींच्या `स्पील`च्या कामांचाही समावेश
Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासला जोडण्यासाठी रेल्वेस्टेशन एमआयडीसी भागात नवा उड्डाणपूल बांधणे, शहर सौंदर्यीकरणासाठी पहिल्यांदाच ५ कोटींच्या निधीची तरतूद, मेल्ट्रॉनमध्ये विविध आरोग्य सुविधा अशी ठळक वैशिष्ट्ये असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प आज प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सादर केला.

डॉ. चौधरी यांनी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.३१) २०२३-२४ या वर्षाचा ३ हजार ८१ कोटी ८९ लाख १२ हजार रुपये जमा तर तीन हजार ८० कोटी ७२ लाख ८५ हजार खर्च असे १ कोटी १६ लाख २७ हजार शिलकीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. त्यात ७३८ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश असून, २९३ कोटी ५० लाख रुपयांची स्पीलची कामे आहेत. महापालिकेचे सुमारे दीड हजार कोटींचे स्वतःचे उत्पन्न अपेक्षित आहे तर उर्वरित निधी हा विविध अनुदानापोटी शासनाकडून मिळेल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhaji Nagar
Sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगर घटनेनंतर रामजन्मोत्सव उत्साहात, मुस्लिम बांधवही रथयात्रेत सहभागी

शहरात झालेल्या जी-२० परिषदेच्या तयारीमुळे महापालिकेचे यंदाचे बजेट लांबणीवर पडले होते. गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांनी बैठका घेत तयार केलेले बजेट शुक्रवारी डॉ. चौधरी यांनी सादर केले. यावेळी ते म्हणाले, की जी-२० परिषदेच्या आयोजनामुळे शहरात सौंदर्यीकरणाची कामे झाली.

शहर असेच सुंदर राहावे, यासाठी पहिल्यांदाच सौंदर्यीकरण हे नवे हेड तयार करण्यात आले. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक कामे झालेली नव्हती, त्यामुळे २९३ कोटी ५० लाखांची स्पीलची कामे यंदाच्या बजेटमध्ये टाकण्यात आली आहेत. स्पीलच्या कामासह वर्षभरात ७३८ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च देखभाल दुरुस्तीवर होणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar
Sambhaji nagar : उपायुक्तांसह २० अधिकारी-कर्मचारी जखमी

१०० कोटींच्या रस्ते कामाची सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही कामे यंदाच्या बजेटमध्ये घेण्यात आली आहेत. उत्पन्नाच्या बाजू सांगताना डॉ. चौधरी म्हणाले, की जीएसटीच्या अनुदानापोटी महापालिकेला शासनाकडून महिन्याला ३२ कोटी ५० लाखांचे अनुदान मिळते. वर्षभरात ३९० कोटी रुपये अपेक्षित असून, मुद्रांक शुल्काच्या एक टक्क्यापोटी ३५ कोटी रुपये महापालिकेला मिळतील.

मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये चालू तर १५० कोटी रुपयांची थकबाकी असे ३५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठरविले आहे. नगर रचना विभागामार्फत २३५.६० कोटी, गुंठेवारी अंतर्गत ५० कोटी तसेच पाणीपट्टीची चालू मागणी ८० कोटी तर थकबाकीपोटी ५० कोटींची वसुली अपेक्षित असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न १५७४ कोटींच्या घरात असून, वर्षभरात मिळणाऱ्या शासकीय अनुदानामुळे अर्थसंकल्पाचे आकडे वाढले असल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे, गायकवाड, शहर अभियंता ए. बी. देशमुख, नगर रचना विभागाचे सहायक संचालक मनोज गर्जे, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

नव्या उड्डाणपुलाचा लवकरच डीपीआर

बीड बायपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील निर्लेप कंपनीजवळ उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लवकर डीपीआर तयार केला जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

प्रत्येक वॉर्डाला मिळणार ५० लाख

प्रत्येक वॉर्डासाठी गतवर्षी १ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला होता. पण शंभर टक्के निधी खर्च झाला नाही. त्यामुळे यंदा ५० लाख रुपये प्रत्येक वॉर्डात विकासकामासाठी मिळणार आहे. त्यासाठी ५७.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()