Sambhaji Nagar : कर वसुलीसाठी आता नवा पॅटर्न, महिनाभरात अंमलबजावणी; पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

या पॅटर्नप्रमाणे प्रत्येक वॉर्डातील २५० ते ३०० मालमत्तांचा एक ब्लॉक तयार केला जाईल.
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal
Updated on

Sambhaji Nagar - स्मार्ट सिटीतील ई- गव्हर्नन्सअंतर्गत महापालिकेकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या प्रभावी वसुलीसाठी आता नवीन पॅटर्न राबवला जाणार आहे. महिनाभरात हा नविन पॅटर्न राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधितांना दिले आहेत. प्रत्येक वॉर्डात अडीचशे ते तीनशे मालमत्तांचा एक ब्लॉक करून त्याचे जिओ फेन्सिग करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी शनिवारी ई-गव्हर्नन्ससंदर्भात आढावा बैठक घेतली. यात मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या सक्षम वसुलीसाठी त्यांनी नवीन पॅटर्न सुचवला आहे. या पॅटर्नप्रमाणे प्रत्येक वॉर्डातील २५० ते ३०० मालमत्तांचा एक ब्लॉक तयार केला जाईल.

Sambhaji Nagar
Pune Parking : कर्वे रस्त्यावर पार्किंगचे बोर्ड लावण्यास महापालिकेची टाळाटाळ

या सर्व मालमत्तांचे जिओ फेन्सिंग केले जाईल आणि या सर्व मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूल करण्यासाठी एक कर्मचारी नियुक्त केला जाईल. प्रत्येक ब्लॉकसाठी एक कर्मचारी यानुसार प्रत्येक प्रभागातील वॉर्डांसाठी ब्लॉकनिहाय कर्मचाऱ्यांकडे कर वसुलीचे नियोजन केले जाणार आहे.

तसेच कर वसुलीसाठी नेमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील टॅग करावे, जेणेकरून त्यांनी किती मालमत्तांना भेट दिली आणि किती वसुली केली, याची माहिती सहजपणे डॅशबोर्डवर पाहता येईल. त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी दररोज गुगल शीटमध्ये माहिती अपलोड करणे गरजेचे राहील.

या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी वसुली कंट्रोल रूम म्हणून स्मार्ट सिटी येथील आयसीसीमध्ये किमान पाच कर्मचाऱ्यांची एक टीम ठेवण्याचे निर्देश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. तसेच याच धर्तीवर कचरा संकलनाचे काम देखील ऑनलाइन बघता येईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत.

Sambhaji Nagar
Mumbai News : 'भाजपा का साथ गद्दर के साथ' म्हणणं भोवलं! पोस्टर झळकावल्याने मुंबईत गुन्हा दाखल

कर व कचरा संकलन माहिती डॅशबोर्डवर

‘मालमत्ता कर व घनकचरा संकलनाची सर्व माहिती दररोज डॅशबोर्डवर जाहीर करावी. आयसीसीमध्ये आणि प्रत्येक वॉर्ड कार्यालयात डॅशबोर्ड लावण्यात यावे, अशी सूचना देखील प्रशासकांनी केली आहे. महापालिकेतर्फे देण्यात येणारा श्‍वान परवाना नूतनीकरण, तसेच नवीन श्‍वान परवाना आणि प्रत्येक परवाना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.