Sambhaji Nagar News: महसूल विभागाने कारवाई केली पण ती ४ वाहने गेली कुठे?

Sambhaji Nagar News:
Sambhaji Nagar News: महसूल विभागाने कारवाई केली पण ती ४ वाहने गेली कुठे? sakal
Updated on

Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासुन घारेगाव( पैठण) व घारेगाव (छञपती संभाजीनगर) सुखना नदी पाञातुन महसुल व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन बिनधास्तपणे अवैध वाळु उपसा सुरु होता.

या संदर्भात वारंवार तक्रारी येवुन हि महसुल विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याशी अर्थपुर्ण संबध ठेवुन या पाञातुन दिवसा ढवळ्या वाळुचा उपसा केला जातो. त्यामुळे वैतागलेले येईल येथील ग्रामस्थांसह पर्यावरण प्रेमींच्या तक्रारी वाढल्याने एखादी कारवाई केली जाते असे नागरीकांचे म्हणणे आहे.

Sambhaji Nagar News:
Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

रविवारी (ता. १९) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास येथील नदी पाञात एका जेसीबी च्या सहाय्याने चार ते पाच ट्रॅक्टर अवैध वाळु उपसा करतांना पैठण तहसीलच्या पथकाने पकडले होते. यातील इतर वाहनांना सोडुन देवुन फक्त एकच ट्रॅक्टर वाळु सह महसुल विभागाने जप्त केला. हि कारवाई नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी वैशाली कांबळे यांच्या पथकाने केली.

सदरील पथकाने चार ट्रॅक्टर व एक जेसीबी धरला होता माञ यातील फक्त एकच ट्रॅक्टरवर कारवाई करुन इतर सर्व वाहने सोडुन देण्यात आली असे घारेगाव येथील नागरीकांचे म्हणणे.

Sambhaji Nagar News:
Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

याच पध्दतीची येथे दर दोन चार दिवसाला कारवाई केली जाते माञ सदरील वाहन धारकांकडुन चिरीमिरी करुन हि वाहने सोडली जातात एखाद्या कारवाईची जास्तच चर्चा झाली तर अशा वाहनांवर कारवाई केली जाते माञ ज्याची जास्त चर्चा झाली नाही अशी वाहने ताब्यात घेवुन त्यावर कारवाई होते.

ज्यावेळी आम्ही कारवाई केली त्यावेळी फक्त एकच ट्रॅक्टर तिथे होते त्यामुळे त्याच्यावर कारवाई करुन सदरील ट्रॅक्टर पैठण तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे

वैशाली कांबळे (मंडळ अधिकारी,आडुळ)

Sambhaji Nagar News:
Private School : आठ शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा E-mail; शहरात भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासन सतर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.