Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर

Marathwada News : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल दाखल करण्यात येवून त्यांचे उपचार सुरू आहेत.
Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Updated on

हबीबखान पठाण

Pachod: केकत जळगाव (ता.पैठण) येथील जिल्हा परिषदे च्या प्राथमिक शाळेत शनिवारी (ता.१७) खिचडीऐवजी पौष्टिक आहार म्हणून दिलेल्या बिस्किटातून दोनशे छप्पन विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

या सर्वांवर पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रात्री उशिरा घरी पाठविण्यात आले. मात्र रविवारी (ता.१८) यांतील सात मुलांना पुनश्चः त्रास सुरू होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल दाखल करण्यात येवून त्यांचे उपचार सुरू आहेत.

Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Sambhaji Nagar : सात दिवस दररोज माफी मागण्याची छोटूला शिक्षा ; प्राण्यांबरोबर रिल बनविल्याने खरडपट्टी

अधिक माहिती अशी, केकत जळगाव (ता.पैठण) येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा असून २९६ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. सर्वत्र शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी व पौष्टीक आहाराचे वाटप केले जाते.

परंतु ता. १७ रोजी शनिवारमुळे शाळा अर्धा दिवसाची असल्याने खिचडीऐवजी विद्यार्थ्यांना पारले व पतंजली बिस्कीटचे वाटप करण्यात आले. हे बिस्कीट खाल्ल्यानंतर अर्ध्या - पाऊण तासाने सुरवातीला पन्नासवर विद्यार्थ्यांना मळमळ व उलट्या होऊन त्यांना अचानक ताप आला. विद्यार्थांची अचानक प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शिक्षकांसह पालकवर्ग भांबावून गेले. त्यांनी विषबाधेची लागण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने पाचोड (ता.पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Sambhaji Nagar : तुझ्या शिक्षणाचा खर्च झेपेना, मला माफ कर;लाडसावंगीत वडिलांनी संपविले जीवन

या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असतांनाच टप्याटप्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन ती दोन छप्पनवर पोहचली. या२५६ विद्यार्थांना मळमळ व उलटयाचा त्रास सुरू होऊन ताप आल्याने पाचोड (ता . पैठण)च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या सर्व विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यावर प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ. संदिपान काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख नोमान, डॉ. बाबासाहेब घुगे, डॉ. प्रकाश साबळे, डॉ. आसाराम चौरे , डॉ. शिवाजी पवार, परिचारिका चंदा भोपळे, डॉ. राहूल दवणे, डॉ.अक्षय खरग आदींनी उपचार केले. सायंकाळपर्यत या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याने रात्री उशीरा त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

शेतावर तर काही बाहेरगावी गेलेल्या पालकांना आपल्या पाल्यांना बिस्कीटातून विषबाधा झाल्याचे समजताच त्यांनी आपाप ली हातातील कामे अर्धवट सोडून ग्रामीण रुग्णालय गाठले होते.अनेकांनी संताप व्यक्त करीत शिक्षकांच्या निष्काळजीपणाविरुद्ध रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच पाचोड पंचक्रोशीसह पैठण तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती, रुग्णालयाच्या प्रांगणातील गर्दी आवाक्या बाहेर जात असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे व पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे,जमादार आण्णासाहेब गव्हाणे, गोविंद राऊत,गणेश रोकडे, संदीप जाधव आदींनी चोख बंदोबस्त ठेवला, तर पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते,किशोर शिंदे, तारांचद घडे आदीनी केकत जळगाव येथे शाळेसमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता. या घटनेची माहिती समजताच जिल्ह्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा परिषदेचे पोषण आहार अधिक्षक, शिक्षणाधिकारी, तहसिलदार, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेवून रुणांची विचारपूस केली.यासंबंधी पोलिस व आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांना दिलेल्या बिस्किटाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.

Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Sambhaji Nagar : जिल्हा परिषदेची इमारत शंभर कोटींची;निविदेनुसार काम अंतिम टप्प्यात,

रात्री उशिरा विषबाधीत विद्यार्थी रुग्णांना सुट्टी देण्यात येवून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र रविवारी (ता.१८) सकाळी कु.प्रीती शरद मगर, सत्यम रवींद्र सानप, अभिषेक अनिल दराडे, अफवान सलीम शेख, सायमा कलीम शेख, तनवीर मन्सूर शेख, प्रियंका गणेश मगर या सात मुलांना पुन्हा मळमळ , उलटया, ताप व पोटदुखीचा त्रास सुरु होऊन त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी प्रथमोपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविले. या सात विदयार्थ्यावर तुर्तास घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आणखी काही रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अशोक बढे (अध्यक्ष,शालेय समिती), 'शाळेत जो प्रकार घडला हा धक्कादायक आहे. परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले होते. हे खाल्ल्यानंतर विद्यार्थीना त्रास झाला. वाटप झालेल्या बिस्कीटचे नमुने घेऊन तपासणी केल्यानंतर हा खरा प्रकार समोर येईल."

भागवत फुंदे (मुख्याद्यापक, जि.प.शाळा, केकतजळगाव),'शाळेत विद्यार्थ्यांना आम्ही जे बिस्कीट वाटप केले,त्याची कालबाह्य तारीख नोव्हेंबर अखेरची आहे. सदरील बिस्कीट आम्ही स्वतः खाऊन पाहीले होते , त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप केले, परंतु अचानक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली हे कसे झाले हे आम्हालाही कळाले नाही."

Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Sambhaji Nagar : उद्योजक-पोलिसांत राखणार समन्वय;‘मसिआ’च्या वाळूज येथील कार्यालयात संयुक्त बैठक

डॉ. प्रकाश साबळे (वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय), "विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले बिस्किटे शिळे असावेत, बिस्किट शिळे असल्याने त्यावर बुरशी वाढून असा प्रकार होऊ शकतो. हे बिस्किट एक्सपायर झालेले होते का ? या अनुषंगाने बिस्किटाचे नमुने घेतले आहेत, हे संपूर्ण बिस्किटांचे नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की समजेल, परंतु सदर प्रकरण हे फूडपॉईझनच आहे. यातील सर्व विद्यार्थ्यांना उपचार देण्यात येवून तब्येत सुधारल्याने सुटी देण्यात आली होती. यांत काळजी करण्यासारखे काही नव्हते. परंतु रविवारी काही विद्यार्थ्यांची तब्येत पुन्हा बिघडली व त्यांना छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. '

मुख्याद्यापक व इतरांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पावणेतिनशे विद्यार्थ्याच्या जिवावर संकट ओढवले. तातडीने संबंधितास निलंबीत करण्यात यावे , अन्यथा सोमवारी (ता. १९) शाळेला कुलूप लावण्यात येईल . "

भिमराव थोरे (माजीसरपंच , केकत जळगाव ),"

Sambhaji Nagar: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विषबाधीत विद्यार्थ्यांची संख्या 256; सात जणांची प्रकृती गंभीर
Sambhaji Nagar Crime : मद्यधुंद दोन तरुणांची भरचौकात तलवारबाजी;सिडको येथे वाहनधारकांत दहशत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.