Sambhaji Nagar: अतिक्रमणामुळे मक्रणपूरच्या उपसरपंचांचे पद झाले रद्द

यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करा अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज बागूल यांनी केली होती.
sarpanch
sarpanch sakal
Updated on

कन्नड - कन्नड शहरालगत असलेल्या मक्रणपूर गावातील विद्यमान उपसरपंचाला अतिक्रमणामुळे पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

sarpanch
Mumbai News : डोंबिवली रेल्वे स्थानकाच रुप पालटणार

विनायक सोनवणे असे या उपसरपंचांचे नाव आहे. जिल्हा अधिकारी अस्तीककुमार पांण्डेय यांनी मंगळवारी (ता.५) हा निर्णय दिला. उपसरपंच सोनवणे यांनी शिवना नदीवरील गावठाण जागेवर अतिक्रमण केले आहे.

यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करा अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज बागूल यांनी केली होती.

sarpanch
Mumbai News : 'स्वराज्य भूमी'वरून भाजपात श्रेय वादाची लढाई! लोढा विरूध्द खासदार शेट्टी

तक्रारीनंतर मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून चौकशी करण्यात आली. तसेच तत्कालीन तहसीलदार संजय वारकड यांनीही स्वतः येऊन पाहणी केली.

यात सोनवणे यांनी नदीपात्रात व सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सोनवणे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.