Sambhaji Nagar : तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकांकडून ‘जोर’; आमदार बागडेंचा शब्द ठरणार अंतिम

'यासाठी' स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची रस्सीखेच सुरू
Sambhaji Nagar
Sambhaji NagarSakal
Updated on

फुलंब्री - तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांची छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने तालुकाध्यक्षपद रिक्त झाले आहे. आता भाजपच्या तालुकाध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी,

यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची रस्सीखेच सुरू असून, आपापल्या पद्धतीने भाजपच्या स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावणे सुरू आहे.

पण, आमदार हरिभाऊ बागडे यांचा शब्द अंतिम ठरणार आहे. त्यामुळे आमदार बागडे तालुकाध्यक्ष पदाची धुरा कुणाच्या पारड्यात टाकणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे

फुलंब्री विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील गेल्या दहा वर्षांपासून आमदार हरिभाऊ बागडे यांचे वर्चस्व सिद्ध झालेले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे यांची थेट विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली होती. याच काळात त्यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत केली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही आमदार हरिभाऊ बागडे यांनी विजय मिळविला होता. पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कार्यकारी सोसायटी आणि आता कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांची थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे तालुकाध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या तालुकाध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी, यासाठी भाजपचे पदाधिकारी यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Local News : दिवा स्थानकात सुविधांचा अंधार ; जंक्शन नावालाच; वर्षानुवर्षे समस्या जैसे थे

पक्षाच्या विस्तारासाठी आपण कोण कोणती भूमिका घेतली आणि मागील पाच ते दहा वर्षांच्या काळात कोणकोणते कामे केली, याचा लेखाजोखा पक्षाच्या नेत्यांकडे मांडला जाऊ लागला आहे.

पक्षाच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात विविध कामे केलेली असल्याने ही जबाबदारी पक्षांनी माझ्यावरच सोपावी, असा आग्रह स्थानिक पातळीवरील पदाधिकारी धरीत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्याकडे मन धरणी करून तालुकाध्यक्ष पदाची फिल्डिंग लावली आहे.

Sambhaji Nagar
Mumbai Crime : आठवडाभरापूर्वी बाहेर आला, पुन्हा घडली जेलची वारी

भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात

भाजपच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सेटिंग लावली असली तरी सर्व बाजूने सक्षम असणाऱ्या पदाधिकाऱ्याचीच तालुकाध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

तालुकाध्यक्षपद हे पक्षाच महत्त्वाचे पद असून, या पदाला पक्षात मोठा मानसन्मान दिला जातो. तसेच आता भाजप पक्ष सत्तेत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष होण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.