Sambhaji Nagar RTO : दिवसभरात शंभरपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई; ‘आरटीओ’च्या कारवाईने खळबळ

काही दिवसापूर्वी येथील एका तरुणाने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईचे स्टिंग ऑपरेशन करून थेट मुख्यमंत्रीकडे ‘पोलखोल’ करून तक्रार केली होती.
Sambhaji Nagar RTO
Sambhaji Nagar RTOSakal
Updated on

Sambhaji Nagar - वैजापूर शहरासह ग्रामीण भागातील वाहनांवर परिवहन विभागाच्या पथकाने शंभरपेक्षा अधिक वाहनांवर बुधवारी (ता.१२) दिवसभर मोठी कारवाई केल्याने एकच ‘खळबळ’ माजला आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी येथील एका तरुणाने परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईचे स्टिंग ऑपरेशन करून थेट मुख्यमंत्रीकडे ‘पोलखोल’ करून तक्रार केली होती. दरम्यान, या तक्रारीचा सूड घेण्यासाठी अधिकारी आता वैजापूरला ‘टार्गेट’ करत आहे का असा आरोप आता वाहनधारकांमधून केला जात आहे.

Sambhaji Nagar RTO
Sambhaji Nagar : शिक्षकांअभावी शाळा पडल्या ओस; शिक्षकांची तब्बल २२७ पदे रिक्त, जिल्हा परिषदेत कसे मिळणार दर्जेदार शिक्षण ?

बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास परिवहन विभागाचे अनेक अधिकारी तीन वाहनांतून वैजापूर शहरात दाखल झाले. त्यांनी आंबेडकर चौक, येवला रोड, गंगापूर रोड, खंडाळा रोडसह शहरातील विविध ठिकाणांहून जाणारी ओव्हरलोडींग, परवाना नसणे, कागदपत्रांमध्ये अनियमितता या कारणांवरून छोटी-मोठी वाहने तपासण्याची मोहीम राबविली.

या कारवाईत जवळपास शंभरपेक्षा अधिक वाहनांना पकडून त्यांच्यावर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करीत वाहने वैजापूर बस आगाराच्या आवारात लावण्यात आली आहे.

Sambhaji Nagar RTO
Pune Crime : हडपसर, वानवडी परिसरात मटका जुगार अड्डे राजरोसपणे सुरू ; दोन दिवसांत ५१ जण ताब्यात

दरम्यान, अचानक झालेल्या या जम्बो कारवाईमुळे स्कूल बस, पाणीपुरवठा करणारी वाहने, फळभाज्यांची वाहने, दूध वाटप करणारे शेतकरी यासह अनेक वाहने जप्त झाली. त्यामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळित झाल्याचे बघायला मिळाले. या पथकांनी ४४ ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात धडक कारवाई करून तीन लाखांची दंडात्मक वसुली केली. उर्वरित आठ लाख रुपयांच्या वसूलीसाठी वाहने जप्त करण्यात आले आहेत.

Sambhaji Nagar RTO
Chhatrapati Sambhaji Nagar : वृद्ध नवऱ्याकडून तिसऱ्या पत्नीचा खून, तीन बायका, नऊ अपत्ये; दोघी बहिणी होत्या सवत

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणून कारवाई का?

गोदावरी नदीतून वाळूची ओव्हरलोड वाहने परिवहन विभागाच्या अधिकारी कशा पद्धतीने मापात पाप करून बोगस कारवाई करतात याची ''पोलखोल'' येथील राहुल लांडे या तरुणाने केली होती. विशेष म्हणजे बोगस कारवाईचे लाइव्ह व्हिडियो बनवून या तरुणाने थेट मुख्यमंत्री व गृहमंत्रीकडे आरटीओ अधिकाऱ्यांची तक्रार केली होती.

दरम्यान, तक्रारीनंतर संबंधित अधिकारीमांगे चौकशीची सासेमारी लागली आहे. त्यामुळेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ''बदला'' घेण्यासाठी वैजापूरला टार्गेट करत असल्याचे आरोप नागरिक उघडपणे सोशल मिडियावर पोस्ट करून आजच्या कारवाई विषयी संताप करताना दिसले.

फोन उचलला नाही

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एकाचवेळी वैजापुरात केलेल्या कारवाई विषयी अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला असता कोणाचा फोन बंद होता तर कोणी फोन उचलला नाही. त्यामुळे किती वाहनावर कारवाई झाली व किती दंड वसूल केला याचे आकडे स्पष्ट झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.