Sambhaji Nagar : सत्तार ठरवतील तोच अध्यक्ष ,जिल्हा बँक निवडणूक आज नाव ठरणार, उद्या निवडणार

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी स्वतः अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार
abdul sattar
abdul sattar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या अध्यक्षाची निवड सोमवारी (ता.११) होणार आहे. या बँकेवर पकड मिळवलेले अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांचे पारडे जड असल्यामुळेच बँकेचा अध्यक्ष कोण होणार हे सत्तारच ठरवणार आहेत. अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

रविवारी (ता.१०) अध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल, सोमवारी अधिकृत निवड होईल. यात बिनविरोधासाठी पालकमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नितीन पाटील यांनी एक ऑगस्टला राजीनामा दिला होता.

abdul sattar
Sambhaji Nagar : जखमीला न्याय देण्यासाठी न्यायाधीश आले पार्किंगमध्ये

सात ऑगस्टला मंजूर केलेला राजीनामा बँकेतर्फे २१ऑगस्टला सहनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर ११ सप्टेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात पक्षीय बलाबल बघितल्यास शिवसेना शिंदे गटाचे पारडे जड आहे. यामुळे अध्यक्षही शिंदे गटाचाच होईल.

abdul sattar
Solapur News : वंदे भारत एक्स्प्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी स्वतः अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संदीपान भुमरे हे इच्छुक आहेत. यासह अन्य अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

abdul sattar
Jalna News : रिमझिमनंतर पोळा सणाच्या खरेदीला उत्साह,विविध साहित्यांना मागणी,पावसाच्या उघडीपचे संकट टळले

हे आहेत इच्छुक

पालकमंत्री संदीपान भुमरे, अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार, दिनेश परदेशी, कृष्णा पाटील डोणगावकर, जावेद पटेल, अप्पासाहेब पाटील, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, जगन्नाथ काळे, अभिषेक जैस्वाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.