Sambhaji nagar : शाळा, महाविद्यालयांच्या गेटजवळच टपरी चहाची... अन् विक्री मात्र तंबाखूजन्य पदार्थांची

शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, पानमसाला, मावा, सिगारेट, सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी आहे.
 selling tobacco products
selling tobacco productssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण संस्थांजवळ शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येवू नयेत, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, या नियमाला हरताळ फासून शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांना लागूनच तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. शाळा, महाविद्यालयांनी तक्रार करूनही लागूनच असलेल्या पानटपऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे बालवयातच विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, पानमसाला, मावा, सिगारेट, सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी आहे. तरी देखील शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालयांच्या गेटवरच पानटपऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. काही शाळांच्या परिसरात पान टपऱ्या नसल्यातरी चहा व्यावसायिकांच्या छोट्या छोट्या टपऱ्या आहेत.

 selling tobacco products
Nashik Fraud Crime: डॉक्टरची 36 लाखांची फसवणूक

यापैकी काही चहाच्या टपऱ्यावर सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. त्यामुळे टपरी चहाची विक्री मात्र तंबाखूजन्य पदार्थाची, असे चित्र पहायला मिळत आहे. लहान वयात तंबाखू, सिगारेटचे व्यसन विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरते. यावर शिक्षण विभाग मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 selling tobacco products
Nashik Crime: मायलेकींना मारहाण अन् विनयभंगप्रकरणी सक्तमजुरीची शिक्षा

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३ मधील कलम ६ (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण संस्थेच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. यात सिगारेटचाही समावेश आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर दोनशे रुपये दंड आणि शिक्षापात्र गुन्हा नोंद करण्याची देखील तरतूद आहे.

तंबाखूमुक्त अभियान नियमावली

  • शाळा, महाविद्यालय प्रवेशद्वाराजवळ ‘तंबाखू विक्रीस बंदी’ फलक बंधनकारक

  • शैक्षणिक संस्थांपासून शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी

  • लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे तथा मुलांकडून विक्री करून घेण्यास बंदी

  • प्रत्येक शाळेने समन्वयक नेमणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.