छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय मुलीवर तिच्याच प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक, शिवाजी जगन्नाथ, याने आपल्या पदाचा गैरवापर करत मुलीवर बलात्कार केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मुलीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने ती आनंदात होती आणि तिच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने तयारी करत होती. मात्र, आरोपी शिक्षकाने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. आरोपीने मुलीला सांगितले की ती मुंबईला ट्रेनिंगसाठी जाणार आहे आणि यासाठी तिला रेल्वे स्टेशनवर यावे लागेल. मुलगी आपल्या शिक्षकावर पूर्ण विश्वास ठेवून स्टेशनवर पोहोचली. मात्र, आरोपीने तिला तेथील एका हॉटेलमध्ये नेऊन रूममध्ये तिच्यावर अत्याचार केला.
घटनेनंतर मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी तात्काळ वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी शिवाजी जगन्नाथ याच्यावर पोक्सो (Protection of Children from Sexual Offences) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपीला लवकरच अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. पालक आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे की शिक्षण क्षेत्रात विश्वास ठेवायला हवे असलेल्या शिक्षकांनीच अशा विकृत कृत्यांना अंजाम दिला आहे. सामाजिक संघटनांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला तातडीने अटक करून न्यायालयात हजर करावे आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याने या प्रकरणामुळे राज्यातील पोलीस व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदे असले तरी, त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.