कळंब - ढोकी रस्त्यावरील जिजाऊ चौकातील स्टेट बँकेचे अख्खे एटीएम चोरट्यांनी रोख ३९ लाख रुपये रकमेसह पळविल्याने शहरात खळबळ उडाली. एटीएम फोडून रक्कम पळविने व आता अख्खे एटीएम पळविल्याची शहरात ही दुसऱ्यांदा घटना घडल्याने रात्रीची ग्रस्त असताना चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
ढोकी मार्ग या मुख्य मार्गावर दिवसरात्र रहदारी असते. या मार्गावरील जंत्रे कॉम्प्लेक्स इमारतीतील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी (ता.३०) ही घटना उघडकीस आली.
स्टेट बँकेचे एटीएम ढोकी जाणाऱ्या मुख्य मार्गावर असून संबधित एजन्सिने बुधवारीच एटीएममध्ये रोकड भरली होती. त्यामुळे चोरट्यांच्या हाती शिल्लक ३९ लाखांची रक्कम लागल्याची माहिती आहे.चोरट्याने अख्खे एटीएम मशीन रकमेसह चोरी करताना चोरांनी पोलिसांना कुठलाही पुरावा सापडू नये, याची खबरदारी घेतली.
ही मशीन लहान वायर व दोरीचा साह्याने उचलून मोठ्या वाहने पळविल्याच्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत, कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव,पोलिस निरीक्षक सुरेश साबळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फिंगर प्रिंट्स तज्ज्ञांना पाचारण केले होते.
चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही धागेदोरे मिळतात का, याची चौकशी सुरू केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळंब पोलिसांनी तपास यंत्रणा जलदगतीने फिरविण्यास सुरुवात केली आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.श्वान परळी रस्त्यावरील बसस्थानकासमोर जावून थांबले. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
शहरात दुसऱ्यांदा घडली घटना -
गेल्या वर्षीही ढोकी रस्त्यावरील चोरट्याने एटीएम फोडून २० लाख रुपयाची चोरी केल्याची घटना घडली होती.त्याचा तपास अर्ध्यावरच अडकला आहे.
बुधवारी परत चोरट्यांनी ढोकी रस्त्यावरील जिजाऊ चौकातील अख्खे एटीएम मशीन रकमेसह पळविल्याचा खळबळ जनक घटना घडली आहे.त्यामुळे पोलिस यंत्रणा किती अलर्ट आहे याबाबत प्रश्न चिन्ह आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.