Sambhaji Nagar : कोट्यवधींची उलाढाल; संभाजी नगरात सोने, चांदीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्रथा आजही उत्साहाने जपली जात आहे.
silver gold prices decreases
silver gold prices decreasessakal
Updated on

पैठण - अधिक महिन्यात व्रत-वैकल्यांबरोबरच धोंडा साजरा करण्यात येत आहे. अधिकमासात जावई व लेकीसाठी नवीन कपडे, चांदीचे निरंजन व जोडवी, पैंजणाची खरेदी जोमात होत आहे. दररोज लाखोंची खरेदी होत असून यामुळे आतापर्यंत १० कोटींची उलाढाल झाल्याचे पैठण येथील सराफ बाजारपेठेला झळाळी मिळाल्याचे चित्र आहे.

silver gold prices decreases
Independence Day: पुण्यात म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान; गायिकेनं प्रेक्षकांमध्ये भिरकावला तिरंगा

अधिक मासात जावयाला वाण देण्याची परंपरा एकविसाव्या शतकातही जपली जात आहे. त्यामुळे जावयाला सोन्याचे दिवस आले आहे. यंदा अधिकमास आल्याने अधिक मास आणि नंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. अधिक महिन्यात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. कार्यक्रमांबरोबरच व्रतवैकल्यांची नवविवाहितांसाठी अधिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे.

अधिक महिन्यात मुलगी व जावई यांना बोलावून पाहुणचार करण्याची परंपरा कायम आहे. यावेळी गोड जेवणाबरोबरच नवीन कपडे व भेटवस्तू दिल्या जातात.

नवीन जावयाला चांदीचे पूजा ताट, निरंजन तर मुलीला चांदीची जोडवी, पैंजण तसेच सोन्याचे दागिने दिले जातात. त्यामुळे सध्या येथील बाजारपेठेत सोने, चांदीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे.

अधिक मास अंतिम टप्प्यात आल्याने घरोघरीलेक जावयाचे कौतुक सोहळे सुरु आहेत. त्यासाठी जोमात खरेदी केली जात आहे. कापड बाजारपेठेसह सराफी पेढ्यांवर गर्दी होत आहे. पै-पाहुण्यांनाही अधिकमासासाठी बोलविण्यात येत आहे.

या महिन्यात मिठाईलाही मागणी वाढली आहे. अधिक मासामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे. बाजारपेठेत अर्थकारणाला चालना मिळाली आहे . यामुळे पैठण येथे सराफ पेठेत सोने चांदीच्या वस्तू खरेदीची लगबग सुरू असून दररोज आहे. सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

silver gold prices decreases
August 15 Independence Day Update: ...असा साजरा झाला ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, एका क्लिकवर वाचा प्रत्येक अपडेट

अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्रथा आजही उत्साहाने जपली जात आहे. त्यामुळे आतापासून सराफ पेठेत खरेदीची लगबग सुरु झाली आहे. चांदीच्या वस्तू दोनशे रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

अधिक मासाच्या महिन्यात महिलांची सोने चांदी वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. यामुळे कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत आहे. वाण देण्याची पद्धत बदलली असली तरी परंपरेची साखळी अतूट राहिल्याने सासरे, जावई व सासू यांच्या नात्यातील स्नेहबंध दृढ होत आहेत.

- कृष्णा लोळगे, सोने चांदी व्यावसायिक, पैठण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()