Sambhajinagar News : धोकादायक झाडांच्या ४२ तक्रारी

शहरातील रस्ते दुभाजकासह हरितपट्ट्यात व काही खासगी जागांमध्ये धोकादायक झालेले वृक्ष पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे पडण्याची भीती आहे.
Sambhajinagar News
Sambhajinagar Newssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते दुभाजकासह हरितपट्ट्यात व काही खासगी जागांमध्ये धोकादायक झालेले वृक्ष पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे पडण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेने अशा धोकादायक इमारतींची माहिती कळविण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार आत्तापर्यंत ४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही झाडे तोडण्याचे व काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शहरातील विविध रस्त्यावरील काही मोठी झाडे वाकलेली आहेत. काही झाडे वाळली असून, पावसाळ्यात अशी झाडे कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता असते.

यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने अशा झाडांची माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. दोन आठवड्यात ४२ जणांनी झाडासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार अशा झाडांचा शोध घेऊन कारवाई सुरू करण्यात आली.

असल्याचे मुख्य उद्यान अधिक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले. उंच झाडांसाठी खासगी क्रेनचा आधार घेतला जात आहे. शुक्रवारी (ता. २१) श्रेयनगर भागातील झांबड इस्टेट येथील साठ ते ७० फूट उंचीच्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या.

Sambhajinagar News
Marathwada Monsoon : लातूर, धाराशिवला जोरदार पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com