CM Majhi Shala Abhiyan : राज्यात ‘सुंदर शाळा’ उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग प्रथम

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातील १४ हजार ३७२ पैकी तब्बल १३ हजार ७५७ शाळांनी सहभाग नोंदवून राज्यभरात आघाडी घेतली आहे. विभागातील केवळ ६१५ शाळा या उपक्रमापासून वंचित राहिल्या आहेत.
CM Majhi Shala Abhiyan
CM Majhi Shala Abhiyansakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातील १४ हजार ३७२ पैकी तब्बल १३ हजार ७५७ शाळांनी सहभाग नोंदवून राज्यभरात आघाडी घेतली आहे. विभागातील केवळ ६१५ शाळा या उपक्रमापासून वंचित राहिल्या आहेत. राज्यात सर्वत्र ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम राबविला जात आहे. यात जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

विभागातील जवळपास ९६ टक्के शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर विभाग टॉपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग आहे. या उपक्रमात सर्वात सुमार कामगिरी पुणे, लातूर आणि नागपूर विभागाची दिसून आली आहे.

CM Majhi Shala Abhiyan
12th Board : बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार ; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्व व्यवस्थापनाच्या सुमारे १४ हजार ३७२ शाळा आहेत. त्यापैकी ९ हजार ३१० शाळांनी ऑनलाइन माहिती अंतिम केली आहे, तर ४,४४७ शाळांनी अंशतः माहिती भरलेली आहे. तसेच सध्या केंद्र स्तरावरून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असतानादेखील जिल्ह्यातील ६२७ शाळांनी अद्यापही ऑनलाइन माहिती भरलेली नाही.

मूल्यांकनाची पद्धत

सुंदर माझी शाळा उपक्रमात सहभागी शाळांच्या केंद्रस्तरीय मूल्यांकनाला ९ फेब्रुवारीपासून केंद्रस्तरीय समितीकडून तपासणीला सुरवात झालेली आहे. ही समिती शाळेसह परिसराचे सौंदर्यीकरण, गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेची इमारत व छत परिसर राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य, आर्थिक साक्षरता आदी उपक्रमांची पाहणी व पडताळणी करून गुणदान करणार आहे.

केंद्रस्तरीय समिती शाळांचे मूल्यमापन करून दोन शाळांची निवड तालुका स्तरावर करणार आहे. तालुका स्तरावरून १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन करून तीन शाळा निवडण्यात येणार आहेत. तालुका स्तरावरील निवड समिती जिल्हा स्तरावर तीन शाळांची निवड विभागीय स्तरावर केली जाणार आहे.

विभागात जवळपास ९६ टक्के शाळा उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. उर्वरित ४ टक्के शाळा या समाजकल्याण विभागाच्या आहेत. त्या शाळांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी थोडी कमी झाली आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्तरावर मूल्यमापनाचे काम सुरू झाले आहे. केंद्र समित्या शाळांची तपासणी करीत आहेत. प्रत्येक केंद्रातील दोन शाळा तालुका स्तरासाठी निवडल्या जाणार आहेत.

- अनिल साबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.