Sambhajinagar : संतप्त आंदोलकांवर फोडल्या नळकांड्या! वाळूज औद्योगिक वसाहतीत पोलीसांच्या ‘मॉक ड्रील’मुळे थरार

मात्र, नंतर कळाले की, हे पोलिसांचे मॉकड्रिल होते!
Sambhajinagar
Sambhajinagaresakal
Updated on

वाळूजमहानगर : ‘‘हमारी मांगे पुरी करो’’ असा नारा देत पोलिसांवर चालून आलेल्या संतप्त जमावावर सशस्त्र पोलिसांनी हॅन्ड ग्रेनेड, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगण्यासाठी पाण्याचा मारा तसेच लाठीचार्ज केला. गुरुवारी (ता.१६) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने काहीवेळ थरार उडाला. मात्र, नंतर कळाले की, हे पोलिसांचे मॉकड्रिल होते!

आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव, आंदोलने तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या काळात तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी दंगा नियंत्रणाचा सराव (मॉक ड्रिल) करण्यात आला.

Sambhajinagar
Travel Tips : खवय्येगिरी करणाऱ्यांचे फेव्हरेट आहे भोपाळ, पण का?

गुरुवारी दुपारी ३ ते ५ च्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस आयुक्तालय, पोलीस कंट्रोल रुम येथील आरसीपी, क्युआरटी पथक, राखीव पोलीस उपनिरीक्षक, पोलीस प्रशिक्षण देणारे शिक्षक तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, वज्र, वरूण वाहने, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका अग्निशमन दलाचे अधिकारी, अंमलदार यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. सरावामध्ये बेकायदेशीर जमावावर वज्र वाहनातून पाण्याचा फवारा मारणे, गॅस गनव्दारे अश्रूधुर नळकांड्या फोडणे, हँन्ड ग्रेनेड जमावावर फेकणे, जमाव भडकवणाऱ्या, लोकांना ताब्यात घेणे, अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Sambhajinagar
Travels Bus Accident : मोठी दुर्घटना!कोकरूड-नर्ले पुलाजवळ खाजगी बसला अपघात; ४० प्रवासी करत होते बसमधून प्रवास

हा सराव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ, संदीप शिंदे, शिवाजी घोरपडे, दिपक रोठे, प्रविण पाथरकर आदींनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.