छत्रपती संभाजीनगर : चोरीचे सोने घेतल्याचा ठपका ठेवत लोणी येथील सोनाराला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. १ जानेवारीला हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सोनाराने गुन्हे शाखेचा पथकावर खंडणीचा आरोप करीत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी आरोप आणि तथ्य तपासत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी महिलेचे दागिने पळवल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पीएसआय संदीप सोळंके यांनी नगर येथील सराईत तीन गुन्हेगारांना अटक केली होती. या आरोपीनी चोरीतील ऐवजदेखील पोलिसांना दिला आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेने लोणी येथील अक्षय ज्वेलर्सचा मालक अक्षय बनसोड याला ताब्यात घेत शहरात आणले होते. त्याचा प्रेस नोटमध्ये उल्लेख करीत त्याचे फोटो देखील काढण्यात आले होते.
तसेच अक्षयवर लोणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहितीदेखील प्रेस नोटमध्ये देण्यात आली होती. या बाबीला सराफा अक्षय बनसोड याने पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत आक्षेप घेतला आहे. पीएसआय सोळंके आणि पथकाने जबरदस्तीने मध्यरात्री घरातून उचलून शहरात आणले. तसेच आपल्याला व आईला वारंवार कॉल करत मानसिक त्रास दिला. आईकडून दमदाटी करत २५ ग्रामची लगड उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीएसआय सोळंके आणि पथकावर खंडणीचा गुन्हा दखल करत कारवाईची मागणी अक्षय बनसोड तसेच त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी आलेल्या तक्रारीत तथ्य तपासत असल्याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी माध्यमांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.