Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर नवी उपाययोजना; ‘रोड हिप्नॉसिस’ टाळण्यासाठी फलक अन् झेंडे

चालकाला वेळोवेळी सतर्क ठेवण्याचे काम
Samruddhi Highway Placards and flags to prevent road hypnosis accident
Samruddhi Highway Placards and flags to prevent road hypnosis accidentSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वाहनाचा वेग नकळत वाढतो आणि त्यानंतर वाहन सलग वेगाने चालवल्याने ‘रोड हिप्नॉसिस’चा म्हणजेच संमोहित झाल्यासारखा अनुभव येतो. त्यामुळेच घात होऊन वाहनांचा अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले.

अशा पद्धतीने संमोहित झालेल्या मनाला पुन्हा ध्यानावर आणण्यासाठी समृद्धीवर रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठिकठिकाणी झेंडे तसेच बोर्ड लावण्याचा उतारा शोधला आहे.

समृद्धी महामार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरवर सहा-सहा झेंडे लावण्यात आले आहेत. यामध्ये काही ठिकाणी प्रत्येक अडीच किलोमीटरवर ऐलभागी व पैलभागी (स्टॅगर्ड) प्रत्येकी तीन-तीन झेंडे लावण्यात आलेले आहेत.

Samruddhi Highway Placards and flags to prevent road hypnosis accident
Pune Accident : रूग्णवाहीकेने चिरडलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू; चालका विरूध्द गुन्हा दाखल.,घटना सीसीटीव्हीत कैद

यामुळे चालक संमोहित होणार नाही. मेंदू व मानसतज्ज्ञांच्या मते कुठल्याही प्रवासात अथवा कृतीत एकसुरीपणा आला, की झोप येण्याची शक्यता बळावते. महामार्गावर शारीरिक व मानसिक थकवा वाढून चालकांना डुलकी लागू शकते.

शिवाय दृश्यमानतेतही बदल होणार नसल्याच्या परिस्थितीने चालकांमधील सतर्कता कमी होते. झेंड्यांकडे पाहिल्यानंतर एक प्रकारे काही तरी हलते आहे, या विचाराने मेंदू सतर्क राहतो. मार्गात आडवे काही येणार असेल किंवा रहदारी अधिक असेल, तर मेंदू त्याची सतर्कता अधिक ठेवत असतो.

Samruddhi Highway Placards and flags to prevent road hypnosis accident
Nashik Bus Accident : बसचालकासह तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार; नातेवाइकांनी हलविले

समृद्धी महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार आतापर्यंतच्या ५६ अपघातांत १०६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात खासगी बस पेटून २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

त्यानंतरही ‘समृद्धी’वर अपघाताची मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अपघाताच्या घटनांचा अभ्यास केला असता, त्यात चालक संमोहित होण्याचाही प्रकार समोर आला असून, त्यावर झेंडे लावण्याचा उतारा शोधण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर प्रत्येक पाच किलोमीटरवर सहा-सहा झेंडे लावण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी स्टॅगर्ड पद्धतीने ठरावीक अंतरात एका बाजूला व ठराविक अंतरात दुसऱ्या बाजूला झेंडे लावण्यात आले आहेत.

- रामदास खलसे, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.