Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वरील तो भीषण अपघात नेमका कसा झाला? ड्रायव्हरनेच सांगितली आपबिती...

मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे
Samriddhi Highway Accident
Samriddhi Highway AccidentEsakal
Updated on

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी आहेत.

मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Samriddhi Highway Accident
Samruddhi Highway Accident: मध्यरात्र, रस्त्यावर थांबलेला ट्रक अन् देवदर्शनावरून निघालेली बस, क्षणार्धात 12 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारे Photo

अपघात नेमका कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आल्याची माहिती अपघातातील बस ड्रायव्हरने दिल्याचीमाहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. ट्रक कमी वेगात होता की थांबला होता याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.

समृद्धी टोल नाक्यावर आरटीओने हा ट्रक थांबवला होता अशीही माहिती आहे. याबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवाणीया यांनी दिली आहे.

Samriddhi Highway Accident
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू; तर २३ जण जखमी, मृतांमध्ये बालकांचाही समावेश

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत सुरू केली. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिस आधिक तपास करत आहेत.

Samriddhi Highway Accident
२३ वर्षानंतरही सोलापूरकरांना मिळाले नाही नियमित पाणी! पहाटे ४ अन्‌ रात्री १२.३० वाजताही भरावे लागते पाणी

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आरटीओच्यावतीने ट्रक अडवण्यात आला आणि तो बाजूला घेत असताना मागून आलेली टेम्पो ट्रॅव्हलर या ट्रकला धडकली. या अपघातात एका लहान मुलाचे आई-वडीलांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तो रडून रडून आई-वडिलांना बोलवत होता. सदरील अपघातानंतर सर्व जखमी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.