Samruddhi Mahamarg : महामार्गावर वेगाचा थरार लावतो आयुष्याला फुलस्टॉप

समृद्धी महामार्गावर वाहनधारक वाहनांची स्थिती लक्षात न घेताच लवकर पोचायचे म्हणून वेग वाढवितात. अपघाताचे हे मुख्य कारण असल्याचे अनेक घटनांमधून पुढे आले आहे. हायवे हिप्नॉसिस, वाहनांचा वेग यासारख्या कारणांमुळे अपघात होत आहेत.
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamargsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वाहनधारक वाहनांची स्थिती लक्षात न घेताच लवकर पोचायचे म्हणून वेग वाढवितात. अपघाताचे हे मुख्य कारण असल्याचे अनेक घटनांमधून पुढे आले आहे. हायवे हिप्नॉसिस, वाहनांचा वेग यासारख्या कारणांमुळे अपघात होत आहेत. हायवे हिप्नॉसिसमुळे मेंदूला निष्क्रियता येते. ती झटकून निघून जावी व अपघात टाळता यावेत यासाठी आता रस्त्याच्या आजूबाजूला साइनबोर्ड, कलर फ्लॅग, रबर स्ट्रीप लावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून वाहनचालक सदैव भानावर असला पाहिजे. मात्र, असे असूनही वेग वाढवण्याचा मोह अनावर होत असल्याने अपघात सुरूच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

समृद्धी महामार्ग हा अत्‍यंत वेगवान महामार्ग असल्याने वाहनांची स्थिती आणि विशेषतः टायरची अवस्था उत्तम असल्याशिवाय या महामार्गावर जाऊ नये, असे नागपूरपासून ते नाशिकपर्यंचे सर्वच आरटीओ अधिकारी सांगत आहेत. प्रसंगी कारवाईही केली जात आहे. मात्र, गुळगुळीत रस्ता आणि त्यावर वाऱ्याशी स्पर्धा करीत वाहन पळविण्याचा अनावर मोह नडत आहे. समृद्धीवर आतापर्यंत नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा सात आरटीओ कार्यालयांनी हजारो टायर्सची तपासणी केली. त्यात एकट्या संभाजीनगर कार्यालयाने टायर सुस्थितीत नसलेल्या दोनशेपेक्षा अधिक वाहनांना परत पाठविले. सर्वच आरटीओ कार्यालयाने अशी कारवाई करीत टायर सुस्थितीत नसलेल्या शेकडो वाहनांना परत पाठविल्याने अनेक अपघात टळले आहेत.

सुसाट सुटणाऱ्यांचे समुपदेशन

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे म्हणाले की, समृद्धीवर अपघात कमी व्हावेत यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली. तसेच वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना सक्तीचे समुपदेशन केले जाते. याशिवाय त्या चालकांची परीक्षाही घेतली जाते. त्यामुळे या महामार्गावर अपघाताची संख्या घटली आहे, मात्र असे असले तरीही चालकांच्या निष्काळजीपणामुळे काही अपघात होतच आहेत. म्हणून सर्वच आरटीओ अधिकारी आपापल्या हद्दीत दररोज कसून चौकशी करत आहेत. छत्रपती संभाजीनगरात जांबरगाव, जांभाळा, वैजापूर, वेरूळ आणि सावंगी इंटरचेंज पॉइंटवरच ही तपासणी होते, तिथे वाहन तपासल्याशिवाय पुढे जातच नाही.

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’च्या बाजूलाच मिळते दारू! काही ठिकाणी महामार्गालगतची संरक्षक भिंत तोडून उभारले शेड

तपासणीनंतरच वाहनाला परवानगी

वाहनांची प्रवासी क्षमता, टायर, टायरमधील हवा, वाहनाचे सीटबेल्ट, इंजिनची स्थिती तपासून पाहिली जात आहे. याशिवाय खासगी वाहतूक बस किंवा इतरही बसचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत आहेत का, ते वेळेवर उघडतात का, याची तपासणी केली जात आहे. तपासणीनंतर वाहन समृद्धीवरील प्रवासासाठी सक्षम असेल तरच पुढे पाठवले जाते. सक्षम नसलेल्या चालकांना पुन्हा परत पाठवले जात आहे. समृद्धीवरील प्रवासात वाहनांचे टायर हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे टायर तपासणी करूनच वाहनांना पुढील प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला जात आहे.

वेगमर्यादा, तरीही वाहने सुसाटच

सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार म्हणाल्या, की समृद्धीवर ट्रकसाठी ताशी ८० तर कार व हलक्या वाहनांसाठी १२० चा वेग निश्चित केलेला आहे. कारवाईसाठी ठिकठिकाणी स्पीडगन लावल्या आहेत. स्पीड ओलांडलेल्या वाहनांना दंड लावला जातो. याशिवाय लेन कटिंग, ओव्हरस्पीड, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अशा विविध प्रकारची कारवाई सुरू आहे, तरीही काही वाहनचालक सुसाट धावतात आणि हकनाक स्वतःचे व इतरांचे प्राण गमावून बसत आहेत. वाहन चालवणाऱ्यांमध्ये जागृती यावी, या मार्गावर अपघात का होत आहेत ते टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी जिल्हा सुरक्षितता समितीच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती असलेला माहितीपट तयार करण्यात आला आहे.

यामुळे मिळते अपघाताला निमंत्रण

  • वाहनाचा वेग

  • हायवे हिप्नॉसिस

  • वाहनाची यांत्रिक स्थिती, मेकॅनिकल ब्रेकडाउन

  • टायर बस्ट होणे

  • चालकाला येणारा थकवा, झोप

  • वाहन चालवताना मोबाइलचा वापर

  • नादुरुस्त वाहनांची असुरक्षितपणे महामार्गावर केलेली पार्किंग

  • अमली पदार्थाचे सेवन किंवा नशा

  • दोन वाहनांत सुरक्षित अंतर न ठेवता चालवणे

  • चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे

अपघात टाळण्यासाठी...

  • प्रवासापूर्वी आपले वाहन यांत्रिकीदृष्ट्या सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी

  • इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, वॉटर इंडिकेटर व इतर लाइटलेवल योग्य असल्याची खात्री करावी

  • घर्षणामुळे टायर बस्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नायट्रोजनची हवा भरून घ्यावी. ती क्षमतेपेक्षा थोडी कमी ठेवावी

  • जास्त वेग असेल तर ऐनवेळी वाहनावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यासाठी १०० च्या वेगमर्यादेत वाहन चालवावे

  • रात्रीच्यावेळी दिव्यांच्या प्रकाशामुळे दृश्यमानता कमी होते त्यामुळे या महामार्गावरून रात्रीचा प्रवास टाळावा

  • शरीर व मेंदूला विश्रांती देण्यासाठी दर १५० ते २०० किलोमीटरनंतर १० मिनिटे ब्रेक घ्यावा. चहा, कॉफी, पाणी प्यावे

  • वाहन चालवताना आजूबाजूचा अंदाज घेत कोणी समोर येणार नाही याची काळजी घ्यावी.

  • या मार्गावर गाडी खराब झाल्यास रस्त्याच्या कडेले सुरक्षित पार्किंग करून इमर्जन्सी हेल्पलाइन ८१८१८१८१५५ या क्रमांकावर संपर्क करावा.

समृद्धी महामार्गाबद्दल..

  • नागपूर ते मुंबई अंतर : ७०१ किलोमीटर

  • किती जिल्ह्यातून जातो :आठ

  • किती तालुक्यातून जातो :२६

  • किती गावापासून जातो : ३९२

  • मार्गावरील पुलांची संख्या : ३३

  • मार्गावरील बोगदे :०६

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्च २०२३ पासून

  • झालेले अपघात :२७

  • या अपघातांमधील झालेले मृत : ५१

  • या अपघातांमध्ये जखमी झालेले : ४७

  • जालना जिल्ह्यात जून २०२२ पासून झालेले अपघात : ०९

  • या अपघातांमधील झालेले मृत : १६

  • या अपघातांमध्ये जखमी झालेले : ०९

तपासणीनंतरच वाहनाला परवानगी

वाहनांची प्रवासी क्षमता, टायर, टायरमधील हवा, वाहनाचे सीटबेल्ट, इंजिनची स्थिती तपासून पाहिली जात आहे. याशिवाय खासगी वाहतूक बस किंवा इतरही बसचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत आहेत का, ते वेळेवर उघडतात का, याची तपासणी केली जात आहे. तपासणीनंतर वाहन समृद्धीवरील प्रवासासाठी सक्षम असेल तरच पुढे पाठवले जाते. सक्षम नसलेल्या चालकांना पुन्हा परत पाठवले जात आहे. समृद्धीवरील प्रवासात वाहनांचे टायर हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे टायर तपासणी करूनच वाहनांना पुढील प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला जात आहे.

वेगमर्यादा, तरीही वाहने सुसाटच

सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार म्हणाल्या, की समृद्धीवर ट्रकसाठी ताशी ८० तर कार व हलक्या वाहनांसाठी १२० चा वेग निश्चित केलेला आहे. कारवाईसाठी ठिकठिकाणी स्पीडगन लावल्या आहेत. स्पीड ओलांडलेल्या वाहनांना दंड लावला जातो. याशिवाय लेन कटिंग, ओव्हरस्पीड, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अशा विविध प्रकारची कारवाई सुरू आहे, तरीही काही वाहनचालक सुसाट धावतात आणि हकनाक स्वतःचे व इतरांचे प्राण गमावून बसत आहेत. वाहन चालवणाऱ्यांमध्ये जागृती यावी, या मार्गावर अपघात का होत आहेत ते टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी जिल्हा सुरक्षितता समितीच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती असलेला माहितीपट तयार करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.