छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. मतदारसंघांना वाटण्यात येणाऱ्या निधीवरून हा वाद झाला असून त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघातील निधीच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला आणि नंतर बैठकीतच शाब्दिक बाचाबाची झाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यापर्यंत हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
"त्यांना असं वाटतं की, आम्हाला जास्तीचा निधी द्या पण आम्ही सर्वांना समान निधी देतो. जेवढा निधी आम्ही वैजापूर, सिल्लोड, गंगापूरला दिला तेवढाच कन्नडला दिला आहे. इथे ठाकरे गट आणि दुसरा कोणता गट असा विषय नाही. आम्हाला सर्व मतदारसंघ सारखे आहेत. दानवे आमच्या अंगावर आले नाही."
"ते विरोधीपक्षनेते आहेत, आवाज उठवणे हे त्यांचे काम आहे. पण ते फक्त उठून बोलत होते. त्यांनी आवाज नाही उठवला तर त्यांना विरोधीपक्षनेता कोण म्हणेल?" असं मत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलं आहे.
"कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा सुरूवातील थोडा गैरसमज झाला होता. विरोधीपक्षनेत्यांनी त्यांच्या मतदारसंघातील थोडे उन्नीस बीस आकडे सांगितले पण पालकमंत्र्यांनी त्यांना खुलासा केला. त्यानंतर त्या दोघांचे समाधान झाले. फक्त मोठ्याने बोलणे म्हणजे वादावादी होत नाही" असं पणनमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
सत्तेतील आमदारांना निधी जास्त मिळतोच - संजय शिरसाट
"प्रत्येक आमदाराला असं वाटतं की, आपल्याला जास्तीचा निधी मिळाला पाहिजे पण सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा अलिखित नियम आहे. पालकमंत्री सर्व तालुक्यांना सारखा निधी देत असतात" असं मत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.