औरंगाबाद - स्त्री शक्तीला चूल आणि मूल या कोषातून बाहेर काढून शिक्षण देण्याचे काम फुले दांपत्यांनी केले. त्यांच्यामुळे आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रीने कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या शिकवणीनुसार शालेय विषयांव्यतिरिक्त मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या विषयासाठी चाकोरीबाहेर जाऊन काम करणारी महिला म्हणजे लाडसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सारिका जैन.
मासिक पाळीविषयी मुलींच्या मनात खूप शंका, गैरसमज व भीती असते. ते दूर करून त्यांना शास्त्रीय माहिती देण्याचे काम श्रीमती जैन करत आहेत. मासिक पाळी हे नाव उच्चारले तरी मुली माना खाली घालतात. त्याविषयी शाळेतच नव्हे तर घरात, समाजात, ग्रामीण, शहरी भागातही बोलणे टाळले जाते. मासिक पाळीच्या काळातील मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आणि अनुपस्थिती या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सारिका जैन यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मुलींमध्ये मासिक पाळीच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत.
तसेच अज्ञानापोटी वाड्यावस्तीवरून येणाऱ्या मुली या काळात शाळेतील अव्यवस्थेमुळे घरीच राहणे पसंत करीत होत्या. पालकांकडूनही त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचे निदर्शनास आल्यावर सारिका यांनी मुलींसोबत बोलण्याचा प्रयत्न सुरू केला.
आधी मुली लाजायच्या
सुरवातीला मुली लाजायच्या. त्यासाठी सारिका यांनी विविध उपक्रम, खेळांच्या माध्यमातून मुलींना बोलते केले. यात मुलींनी नाटक, कवितांच्या माध्यमातून मासिक पाळीबद्दल आपापले मत, भावना व्यक्त केल्या. सारिका जैन यांनी "वेलकम पिरियड', मेरी दीदी मेरी सहेली, कविसंमेलन, प्रश्नपेढी, नाटिका, विविध खेळ, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप इत्यांदी माध्यमातून मासिक पाळी म्हणजे काय? त्याचे शास्त्रीय कारणे समाजावून सांगितली.
हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी
दुकानात जाऊन पॅड आणण्यासाठी मुलींची गोची होत असल्याचे सारिका जैन यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी शाळेतच युनिसेफच्या निकषांनुसार चेंजिंग रूम तयार केली. त्यात मुलींना शाळेतच सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध करून देण्यासाठी वेंडिंग मशीन बसवली. स्वतंत्र शौचालय, हॅण्डवॉश स्टेशन, वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी पॅड नष्ट करणारी मशीन इनसिनरेटरची व्यवस्था केली.
हेही वाचा - धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब!
एमएचएम ऍक्टिव्हिटी रूम
सारिका यांनी शाळेच्या एका वर्गात एमएचएम ऍक्टिव्हिटी रूम तयार केली आहे. या रूममध्ये मुलांना विविध उपक्रमाद्वारे मासिक पाळी, स्वच्छतेविषयी जागृती केली जाते. याठिकाणी प्रश्नपेढी ठेवण्यात आली असून, मुलींना पडलेले अनेक प्रश्न या पेढीत टाकलेले असतात. त्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे सारिका जैन देतात.
वेस्ट टू एनर्जी अभियान
सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीचा खूप मोठा ज्वलंत प्रश्न समाजासमोर आहे. त्यासाठी सारिका जैन यांनी वेस्ट टू एनर्जी नावाचे अभियान सुरू केले आहे. वापरलेल्या सॅनिटरी पॅड नॅपकिन इत्यादी अविघटनशील कचरा यामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते. या अभियानाअंतर्गत जुन्या वर्तमानपत्रापासून पाकीट तयार करून त्यावर लाल ठिपका लावून त्यात सॅनिटरी कचरा पॅक करून कचरा कुंडी किंवा कचरागाडीत टाकला जातो.
येत्या वर्षभरात शहरातील महिला, मुली यांना एक लाख पाकीट विनामूल्य वितरित करून समाजामध्ये जागृतीचा संकल्प सारिका जैन यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.