Sanjay Raut News: "मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला हजर राहणार सांगितले होते पण..."; संजय राऊतांचा खुलासा

Sanjay Raut News
Sanjay Raut News
Updated on

छत्रपती संभाजीनगर:  ‘‘मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या, त्यातून मराठवाड्याला नेमके काय मिळाले? सामान्य माणूस, शेतकऱ्यांना या घोषणांमधून काय मिळाले? हे तर असे झालं गणपती आले अन् नाचून गेले’’, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर केले. यावर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. ‘‘मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर राहणार असे सांगितले आणि ते अस्वस्थ झाले. पण, मी जाणे टाळले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. माझ्यावर लक्ष ठेवायला खास पोलिस ठेवले होते.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून मराठवाड्याच्या जनतेला काय मिळाले? हा खरा प्रश्न आहे. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० हजार कोटींची घोषणा केली होती. आता ४६ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली आहे. फक्त घोषणा करण्यासाठीच एवढा पैसा खर्च केला का? किती पैसे खर्च केले, याचा हिशेब द्या. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पण, मंत्री फक्त ताफे घेऊन फिरत आहेत. रस्ते बंद केले जात आहेत, यांना आता लोकांची भीती वाटायला लागली आहे’’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव केल्याचे श्रेय हे सरकार घेत आहे. पण, संभाजीनगर हे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनीच केले. त्यामुळे याचे खरे श्रेय ठाकरेंचे आहे’’, असा दावाही संजय राऊत यांनी केला. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
"SC-STच्या संविधानिक आरक्षणाला पाठिंबा पण इतर आरक्षणं..."; RSSनं स्पष्ट केली भूमिका

काय म्हणाले संजय राऊत? महत्वाचे मुद्दे -

  • फक्त ताफे फिरत आहेत, रस्ते बंद केले यांना लोकांची भीती वाटते

  • आदर्श घोटाळा महत्त्वाचा आहे मलाही काही ठेवीदार भेटले. हजारो ठेवीदारांचे पैसे गुंतलेले आहे.

  • पोलिस लाठीचार्ज फक्त सामान्य लोकांवर होतो

  • अनेक नामांतर देशात झाले त्याला किती वेळ लागला

  • शिवसेनेला दिलासा मे महिन्यातच मिळाला आहे

  • आता फेव्हिकॉल लावून निर्लज्जपणे हे सरकार बसले आहे

  • एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे हे सांगितले आहे

  • तेव्हाचे राज्यपाल त्यांनी केलेली कार्यवाही बेकायदेशीर होती

  • न्यायालयावर विश्वास आहे बाकी सर्व विकले गेले

  • हजारो गरीब लोक मुख्यमंत्र्यांसमोर येतात; पण त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही

  • फडणवीस यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहू नये

Sanjay Raut News
Devendra Fadnavis : ''मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'' ओबीसींच्या आंदोलनात फडणवीस बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.