लसीकरण केंद्रात दिलेल्या मोबाईल नंबरचा कसा होतोय दुरूपयोग? शिरसाटांनी विचारला जाब

प्रशासनाकडून करण्यात आलेली जागृती आणि कोरोना संसर्गामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. लोक लसीकरणासाठी जात आहेत.
लसीकरण केंद्रात दिलेल्या मोबाईल नंबरचा कसा होतोय दुरूपयोग? शिरसाटांनी विचारला जाब
Updated on

औरंगाबाद : कोरोना लसीकरण केंद्रात (Corona Vaccination Sites) लोक जीव वाचवा म्हणून लस घेण्यासाठी जातात. लसीकरणासाठी मोबाईल नंबर नोंदवला जातो. मात्र या केंद्रावर काम करणारे काही रोजंदारीवरील मुलांकडून त्या मोबाईल नंबरवर संपर्क करून मोबाईलधाकरकांना फोन करून मनस्ताप देत असल्याचे शिवसेना आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनी आढावा बैठकीत निदर्शनास आणुन दिले. लसीकरण केंद्रात दिले जाणाऱ्या मोबाईल नंबरची गोपनीयता पाळली जावे, तिथे दामिनी पथकांच्या नियुक्तीची सूचना केली. प्रशासनाकडून करण्यात आलेली जागृती आणि कोरोना संसर्गामुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. लोक लसीकरणासाठी जात आहेत. या लसीकरण केंद्रावर नोंदणीसाठी मोबाईल नंबर घेतले जातात. मात्र या नंबरचा दुरूपयोग करून मानसिक त्रास दिल्याचे प्रकार घडल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सोमवारी (ता.दहा) जिल्हाधिकारी कार्यालयात (Aurangabad District Collectorate) झालेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आणुन दिले. या गंभीर प्रकाराने सर्वजण आवाक् झाले. (Sanjay Shirsat Question Over Misuse Of Mobile Numbers By Vaccination Sites)

लसीकरण केंद्रात दिलेल्या मोबाईल नंबरचा कसा होतोय दुरूपयोग? शिरसाटांनी विचारला जाब
पुणे-औरंगाबाद महामार्गावर अंगावरुन ट्रक गेल्याने युवकाचा दुर्दैवी अंत

लोकप्रतिनीधींच्या उपस्थितीत दर सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेना आमदर संजय शिरसाट म्हणाले, महापालिका प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. या ठिकाणी डेली वेजेसचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे महापालिकेकडे रेकॉर्ड असेल नसेल माहित नाही मात्र ते असणे गरजेचे आहे. त्याचे कारण सांगताना श्री.शिरसाट चार - पाच दिवसांपूर्वीच्या एका घटनेचा हवाला देऊन निदर्शनास आणून दिले की, एखादी महिला, मुलगी तिथे लस घेण्यासाठी रजिस्टरमध्ये मोबाईल नंबर नोंदवत असते. नंतर त्या मोबाईल नंबरवर फोन जातो. त्यावर लस घेतली का, कशी आहे तब्येत अशी अधूनमधून विचारणा करून मनस्ताप दिला जातो. ही अतिशय गंभीर बाब आहे. एका घटनेत तर चक्क महापालिकेच्या सेवेत असलेल्या महिला डॉक्टरलाच एका वीस बावीस वर्षाच्या रोजंदारी कर्मचाऱ्याने फोन करून संवाद साधला. पहिल्यांदा चुकीने झाले असावे या भावनेतुन महिला डॉक्टरने दुर्लक्ष केले.

मात्र पुन्हा तोच अनुभव आल्यानंतर त्या डॉक्टर महिलेने पतीला सांगितले. त्यांनी त्या फोन करणाऱ्याला समजावूनही उपयोग झाला नाही. ही तक्रार माझ्याकडे आल्यानंतर त्याचा ऑडिओ जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनाही दिला आहे. त्या डॉक्टर दाम्पत्यांनाही गरज पडली तर हजर करतो असे सांगितले. श्री.शिरसाट यांच्या या निवेदनाने सभागृह गंभीर झाले. श्री.शिरसाट यांनी लसीकरण केंद्रात नोंदलेला नंबर दुसऱ्यांकडे गेला कसा यावर चर्चा आता नको. त्याएवजी लसीकरण केंद्रांवरील रोजंदारी काम करणाऱ्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडून तपासून घ्या. लसीकरण केंद्रांवर दामिनी पथके ठेवा महिलांच्या, मुलींच्या काही अशा तक्रारी असतील तर त्या मोकळेपणाने या दामिनी पथकांना सांगू शकतील. या ठिकाणी दिल्या गेलेल्या मोबाईल नंबरची गोपनीयता कायम ठेवली गेली पाहिजे अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.