Chhatrapati Sambhaji Nagar : सातारा-देवळाईची कर भरण्यात बाजी; तब्‍बल १५ कोटींची वसुली; जुने शहर मात्र तळाला

वर्षानुवर्षे समस्यांनी गांजलेल्या सातारा-देवळाईतील नागरिकांनी कर भरण्यात मात्र बाजी मारली.
satara devlai tax payment record 15 cr recovery chhatrapati sambhaji nagar marathi news
satara devlai tax payment record 15 cr recovery chhatrapati sambhaji nagar marathi newsSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वर्षानुवर्षे समस्यांनी गांजलेल्या सातारा-देवळाईतील नागरिकांनी कर भरण्यात मात्र बाजी मारली. महापालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीतून १०० कोटींची वसुली केली आहे. आगामी साडेतीन महिन्यात आणखी २०० कोटींची वसुली करून विक्रम करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे.

आत्तापर्यंत झालेल्या वसुलीतून सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी तब्बल १५ कोटी रुपये भरले आहेत, तर सर्वाधिक कमी वसुली जुन्या शहरातून झाली आहे. महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी शहरात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.

यंदा विक्रमी वसुली करण्यासाठी प्रशासक जी. श्रीकांत यांनी कर वसुली प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत. नुकतीच वसुली कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन वसुली करा, अन्यथा थेट घरी पाठवू, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे दररोजच्या वसुलीत वाढ झाली आहे.

satara devlai tax payment record 15 cr recovery chhatrapati sambhaji nagar marathi news
Nashik Water Crisis: उन्हाळ कांद्याचे भवितव्य चणकापूरसह इतर धरणांच्या आवर्तनावर अवलंबून!

पूर्वी ३० ते ४० लाख रुपये होत असलेली कर वसुली आता ८० ते ९० लाखांवर गेली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्यात आठवड्यात वसुली शंभरी कोटींच्या पुढे गेली आहे. आगामी काळात सुमारे २०० कोटींची वसुली करण्याचा मनोदय प्रशासकांनी केला आहे.

आत्तापर्यंत झालेल्या वसुलीत सातारा देवळाई भागातून म्हणजेच प्रभाग आठने १४.८३ कोटींची मालमत्ता कराची व ४६ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल केली. बहुसंख्य भागात महापालिकेची नळ योजना नाही. त्यामुळे पाणीपट्टी वसुली कमी आहे. पाणीपट्टी व मालमत्ता कराची एकत्रित आकडेवारी पाहता प्रभाग-७ मधून १३.९६ कोटी मालमत्ता कर तर २.३५ कोटी पाणीपट्टी वसुली केली आहे.

satara devlai tax payment record 15 cr recovery chhatrapati sambhaji nagar marathi news
Nagpur Water Supply: नागपुरकरांसाठी महत्वाची बातमी! विविध भागांमध्ये 'या' तीन दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद

जुन्या शहरात आत्तापर्यंत २.८४ कोटी एवढी कर वसुली झाली आहे. हे प्रमाण कमी असल्याने त्या भागात आगामी काळात वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. सातारा-देवळाई वॉर्डात मालमत्तांची संख्याही जास्त असल्याने वसुलीचा आकडा मोठा आहे.

— अपर्णा थेटे, उपायुक्त महापालिका

गुंठेवारी नियमित करण्यातही पुढेच

गुंठेवारी नियमितीकरणाच्या मोहिमेला सातारा-देवळाई भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरवातीच्या काही महिन्यात एकट्या सातारा-देवळाई भागातून ३५ कोटी २ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. त्यानंतर हा आकडा ६० ते ६५ कोटींच्या घरात गेला. महापालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत गुंठेवारी नियमितीकरणातून १२० कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील अर्धे पैसे सातारा-देवळाईतून जमा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.