Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला ; पाचवीला २१,५४० तर आठवीसाठी १८ हजार ४६१ विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात येणार आहे.
Scholarship
Scholarship sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट दोन फेब्रुवारीपासून शाळेच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडून हॉलतिकीट घ्यावेत, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले.

यंदा पाचवीसाठी २१ हजार ५४० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या १० हजार २०१ तर मुलींची संख्या ११ हजार ३३९ इतकी आहे. आठवीसाठी १८ हजार ४६१ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये मुलांची संख्या ८ हजार ९९५ तर मुलींची संख्या ९ हजार ४६६ इतकी आहे. १८ फेब्रुवारीला जिल्ह्यात पाचवीसाठी १७१ तर आठवीसाठी १३८ अशा एकूण ३०९ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर येताना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे.

Scholarship
NMMS Scholarship : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ

मागील काही वर्षांपासून पाचवीसाठी किमान २५० रुपये ते कमाल एक हजार रुपये तर आठवीसाठी किमान तीनशे रुपये ते कमाल दीड हजार रुपये अशी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये तेरा वर्षांपासून वाढ झालेली नव्हती. त्यामुळे शासनाने या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली असून आता पाचवीसाठी पाचशे रुपये प्रतिमाह (पाच हजार रुपये प्रतिवर्ष) तर आठवीसाठी दरमहा साडेसातशे रुपये (साडेसात हजार रुपये प्रतिवर्ष) इतकी करण्यात आली आहे. सुधारित शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू करण्यात आली आहे. परीक्षा योजनेच्या अन्य नियम आणि अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेदेखील शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.