Chh. Sambhaji Nagar : बालविवाह रोखण्यासाठी सरसावले विद्यार्थी ; जिल्ह्यातील ३,४६४ शाळांमध्ये घेतली शपथ

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सक्षम’ हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प जिल्हा भरात राबविण्यात येत आहे.
school students took oath to prevent child marriage chhatrapati sambhajinagar
school students took oath to prevent child marriage chhatrapati sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालयांत जनजागृती करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत ३ हजार ४६४ शाळांनी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच ९२ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सक्षम’ हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प जिल्हा भरात राबविण्यात येत आहे. प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शाळा सोडून गेलेल्या मुलींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये सलग १५ दिवसांपेक्षा जास्त गैरहजर असणाऱ्या मुलामुलींच्या घरी गृहभेटी देऊन गैरहजरीच्या कारणांचा मागोवा घेऊन विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे कारण तपासण्यात येत आहे.

तसेच स्थलांतरित झालेल्या मुलामुलींची संपूर्ण नोंद करुन त्यांना शिक्षण हमी कार्ड देऊन १८ वर्षांपर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यात येत आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत बालविवाह निर्मूलनासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ४६४ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण करताना जिल्ह्यात सतत १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस ११३ विद्यार्थी गैरहजर आढळून आले होते. त्यामध्ये ६९ मुले; तर ६४ मुली होत्या. या मुलांच्या पालकांचे समुपदेशन केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात यापैकी ९२ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले. त्यामध्ये ४१ मुले आणि ४९ मुलींचा समावेश होता.

हेल्पलाइनची सुविधा

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात १०९८ व ११२ चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक लिहिण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ४६४ पैकी ३ हजार ९६ शाळांनी दर्शनी भागात टोल फ्री नंबर लिहिला आहे. राहीलेल्या ३६८ शाळांना शिक्षण विभागाने तातडीने क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिले आहे. ‘बालविवाह प्रतिबंध कायदा’ हा महत्त्वाचा आहे. या कायद्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमले आहेत. महिला बालविकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक हे त्यामध्ये अधिकारी म्हणून काम पाहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.