Sambhaji Nagar : सात दिवस दररोज माफी मागण्याची छोटूला शिक्षा ; प्राण्यांबरोबर रिल बनविल्याने खरडपट्टी

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातील बिबट्या, कोल्ह्याला हात लावून रिल कारणाऱ्या छोटू चाऊसला शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांनी प्रशासकांसमोर हजर केले. प्रशासकांनी त्याची खरडपट्टी काढत सात दिवस रोज सोशल मीडियावरून माफी मागण्याची शिक्षा दिली.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातील बिबट्या, कोल्ह्याला हात लावून रिल कारणाऱ्या छोटू चाऊसला शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांनी प्रशासकांसमोर हजर केले. प्रशासकांनी त्याची खरडपट्टी काढत सात दिवस रोज सोशल मीडियावरून माफी मागण्याची शिक्षा दिली.

छोटू चाऊसने पिंजऱ्यातील बिबट्या, कोल्ह्याला हात लावून रिल तयार केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने (मराठवाडा आवृत्ती) वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेने छोटूचा शोध घेत त्याला दुपारी सिद्धार्थ उद्यानात प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासमोर हजर केले. पुढील सात दिवस प्राणिसंग्रहालयात काम करत वन्यजीवांना त्रास होणार नाही, असे वर्तन सर्वांनी करावे, वन्यजीव संरक्षण कायदा काय आहे? याची जनजागृती करणाऱ्या रिल तयार कर आणि त्यात शेवटी माफी माग,’ अशी शिक्षा जी. श्रीकांत यांनी सुनावली.

सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

वन्यजीव कायदा १९७२ नुसार वन्यजीवांना हाताळणे, पाळणे, त्यांच्यासोबत व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी पाच ते सात वर्षांपर्यंत कारावास २५ हजारांपर्यंत दंड अशी शिक्षा आहे. असे असताना प्रशासकांनी माफी मागण्याची शिक्षा सुनावल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. छोटू चाऊस हा काही माजी नगरसेवकांच्या जवळचा असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.