ओव्हर हेड केबल चोरीची रेल्वेकडून गंभीर दखल


Serious attention from overhead cable theft by railway
Serious attention from overhead cable theft by railwaysakal
Updated on

औरंगाबाद : नगरसोल ते तारुर दरम्यान विद्युतीकरणातील ओव्हर हेड केबल चोरीच्या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदर सिंग यांनी घटनास्थळी पाहणी केली. यापुढे चोरीचा प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, ट्रॅक मॅन आणि खासगी सुरक्षारक्षक रात्री रेल्वे रुळावर गस्त घालणार आहेत.


Serious attention from overhead cable theft by railway
‘गांव तेथे एसटी’ची ओळख पुसली

नगरसोल ते तारुरदरम्यान विद्युतीकरणातील १२० मीटर ओव्हर हेड वायर चोरट्यांनी लांबवली. त्यामुळे खांबांवर लटकलेली उर्वरित वायर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस तब्बल दोन तास अंधारात थांबल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. चार) रात्री घडला. वायर अडकल्यामुळे रेल्वे तशीच पुढे गेली असती तर विद्युतीकरणाचे खांब कोसळण्याची भीती होती. परंतु रेल्वे तत्काळ थांबल्याने सुदैवाने तसे घडले नाही. या घटनेनंतर शनिवारी (ता. पाच) उपिंदर सिंग यांनी वायर चोरीला गेलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. या सगळ्या प्रकाराची रेल्वे प्रशासनाने ही चौकशी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()